‘जेन जी’, ‘जेन अल्फा’ तुमची पिढी आम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल - पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली , 26 डिसेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी सांगितले की वीर बाल दिवस हा गुरु गोविंद सिंग यांच्या साहिबजादे-जोरावर सिंग आणि बाब
‘जेन जी’, ‘जेन अल्फा’ तुमची पिढी आम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल - पंतप्रधान मोदी


नवी दिल्ली , 26 डिसेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी सांगितले की वीर बाल दिवस हा गुरु गोविंद सिंग यांच्या साहिबजादे-जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या अद्वितीय बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. यावेळी त्यांनी जेन जी च्या आत्मविश्वासावर पूर्ण विश्वास व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले,“जेन जी, जेन अल्फा… आणि तुमचीच पिढी भारताला ‘विकसित भारत’ या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. मी जेन जी ची क्षमता, तुमचा आत्मविश्वास पाहतो, समजतो आणि म्हणूनच तुमच्यावर मला पूर्ण विश्वास आहे.” यासोबतच त्यांनी जेन जी आणि जेन अल्फा यांना भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने नेतृत्व करण्याचे आवाहन केले. “तुम्ही जेन जी आहात, संघटनांशी जोडलेले आहात आणि तुम्ही जेन अल्फा देखील आहात. तुमची पिढी देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल,” असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी संस्कृतमधील एका श्लोकाचा उल्लेख करत सांगितले की, एखादे लहान मूल जर ज्ञानाची गोष्ट सांगत असेल, तर ती स्वीकारली पाहिजे. त्यांनी तरुण वयात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. “तुम्ही कमी वयात मोठी कामे करू शकता, आणि तुम्ही ते करून दाखवले आहे. मात्र, या यशाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. तुमची स्वप्ने आकाशापर्यंत न्या. देश ठाम निर्धाराने तुमच्या पाठीशी उभा आहे,” असे त्यांनी सांगितले.

भूतकाळातील निराशेची आजच्या संधींशी तुलना करताना पंतप्रधान म्हणाले की, पूर्वी तरुण स्वप्ने पाहण्यास घाबरत होते, कारण जुन्या व्यवस्थेमुळे निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता देश प्रतिभेचा शोध घेत आहे आणि 140 कोटी नागरिकांच्या ताकदीवर आधारित भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. त्यांनी इंटरनेट, स्टार्टअप मिशन आणि लक्ष्यित विकासासाठी उभारलेल्या विविध प्लॅटफॉर्म्सचा उल्लेख केला.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) वर विशेष भर दिला. हे धोरण पाठांतराऐवजी व्यावहारिक शिक्षण, चिकित्सक विचारसरणी आणि प्रश्न विचारण्याला प्राधान्य देते, असे त्यांनी सांगितले. पहिल्यांदाच सरकार नव्या शिकण्याच्या आणि विचार करण्याच्या प्रक्रियेच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी नमूद केले. नवकल्पना आणि डिझाइन थिंकिंगला चालना देण्यासाठी अटल टिंकरिंग लॅब्सच्या भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले.

वीर साहिबजादे जोरावर सिंग यांनी अवघड मार्ग ओळखून घेतल्याची आठवण करून देत, पंतप्रधानांनी तरुणांना आपली समज आणि विवेक टिकवून ठेवण्याचा सल्ला दिला.“यामुळे देशाची प्रगती होते. फारच जास्त लक्ष केंद्रित ठेवा. क्षणिक लोकप्रियतेच्या झगमगाटात वाहून जाऊ नका. तुमची विचारसरणी स्वच्छ, तत्त्वनिष्ठ असली पाहिजे. आदर्श आणि थोर व्यक्तींकडून शिकत राहा,” असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी यावर भर दिला की वैयक्तिक यशामुळे इतरांनाही प्रेरणा मिळाली पाहिजे. कौशल्य विकास, इंटर्नशिप, क्रीडा प्रोत्साहन, फिनटेक, उत्पादन क्षेत्र (मॅन्युफॅक्चरिंग) आणि युवा भारत प्लॅटफॉर्म यांसारख्या उपक्रमांच्या केंद्रस्थानी तरुणाई असली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात नवे संधीचे दरवाजे उघडत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. तसेच एनईपी मधील बहुविषयक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाच्या वापराला त्यांनी ‘विकसित भारत’ घडवण्याशी जोडले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande