बांगलादेशात हिंदू युवकाच्या हत्येवर भारताचा तीव्र निषेध
नवी दिल्ली, 26 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये एका हिंदू व्यक्तीच्या अलीकडील हत्येवर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना लक्ष्य करणाऱ्या अलीकडील घटनांची मालिका “चिंताजनक” असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारची ह
बांगलादेशात हिंदू युवकाच्या हत्येवर भारताचा तीव्र निषेध


नवी दिल्ली, 26 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये एका हिंदू व्यक्तीच्या अलीकडील हत्येवर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना लक्ष्य करणाऱ्या अलीकडील घटनांची मालिका “चिंताजनक” असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारची हिंसा दुर्लक्षित करता येणार नाही, असा इशाराही भारताने दिला आहे.

शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, सीमापार घडणाऱ्या घटनांकडे नवी दिल्ली गंभीरतेने लक्ष देत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की अशा हल्ल्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हिंदूंविरोधातील हिंसाचाराचा निषेध करत, या गुन्ह्यांसाठी जबाबदार असणाऱ्यांची ओळख पटवून त्यांना शिक्षा केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

रणधीर जयस्वाल म्हणाले, “बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांविरोधात सातत्याने दिसणारी शत्रुत्वाची भावना अत्यंत चिंताजनक आहे. बांगलादेशमध्ये अलीकडेच एका हिंदू युवकाची झालेली हत्या आम्ही निषेधार्ह मानतो आणि या गुन्ह्यातील दोषींना शिक्षा होईल, अशी अपेक्षा करतो.”

हे विधान बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीच्या लिंचिंगच्या घटनेनंतर अवघ्या एका दिवसाने आले आहे. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांत अल्पसंख्याक समुदायाशी संबंधित हिंसक घटनांच्या वाढत्या यादीत आणखी एका गंभीर घटनेची भर पडली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande