शिरूरला विवेकानंद स्वामींचे जल्लोषात स्वागत
बीड, 26 डिसेंबर (हिं.स.)। श्री सिद्धेश्वर संस्थानाचे मठाधिपती म्हणून १६ वर्षे यशस्वी कारभार पाहिल्यानंतर महामंडलेश्वर विवेकानंद स्वामी यांनी संन्यास स्वीकारला. मुंबईतील कांदिवली येथील आनंदवन आश्रमात ते महामंडलेश्वरपदी विधिवत विराजमान झाले. नंतर प्
शिरूरला विवेकानंद स्वामींचे जल्लोषात स्वागत


बीड, 26 डिसेंबर (हिं.स.)।

श्री सिद्धेश्वर संस्थानाचे मठाधिपती म्हणून १६ वर्षे यशस्वी कारभार पाहिल्यानंतर महामंडलेश्वर विवेकानंद स्वामी यांनी संन्यास स्वीकारला. मुंबईतील कांदिवली येथील आनंदवन आश्रमात ते महामंडलेश्वरपदी विधिवत विराजमान झाले. नंतर प्रथमच शिरूर कासार शहरात त्यांचे आगमन झाले.

या ऐतिहासिक प्रसंगी शहरासह पंचक्रोशीतील भाविकांत भक्तिभाव आणि उत्साहाचे वातावरण होते. जिजामाता चौकातून स्वामीजींच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. सवाद्य मिरवणुकीत वारकरी वेशातील महिला, बालक, टाळ-मृदंगाचा गजर आणि सजवलेल्या रथात स्वामीजींची मिरवणूक वणूक निघाली. शहरातून मार्गक्रमण करत मिरवणूक श्री सिद्धेश्वर संस्थानात पोहोचली.

शिरूर शहरात आनंदवनाचे महामंडलेश्वर विवेकानंद स्वामी यांचे रथातून मिरवणूक काढून भव्य स्वागत करण्यात आले. तेथे दर्शनासाठी भाविकांनी

सिद्धेश्वर संस्थानाला धाकटी अलंकापुरी म्हणून ओळख मिळवून दिल्यानंतर विवेकानंद स्वामींनी संन्यास घेतला. मुंबईतील आनंदवन आश्रमात महामंडलेश्वरपदी विराजमान झाल्यानंतर शिरूरनगरीत प्रथमच आगमन झाले.या वेळी भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात जयघोष केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande