धुळे : टिटाणे येथील ३३/११ केव्ही. विज उपकेंद्राचे लोकार्पण
धुळे, 27 डिसेंबर (हिं.स.) साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील टिटाणे येथील ३३/११ केव्ही. विज उपकेंद्राच्या लोकार्पणाचा कार्यक्रम साक्री तालुक्याच्या कार्यसम्राट आमदार सौ. मंजुळाताई गावित यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन
धुळे : टिटाणे येथील ३३/११ केव्ही. विज उपकेंद्राचे लोकार्पण


धुळे, 27 डिसेंबर (हिं.स.) साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील टिटाणे येथील ३३/११ केव्ही. विज उपकेंद्राच्या लोकार्पणाचा कार्यक्रम साक्री तालुक्याच्या कार्यसम्राट आमदार सौ. मंजुळाताई गावित यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रितम काळे, उप अभियंता साक्री गणेश जाधव, विपुल भामरे, हेमंत अहिरे व छडवेल उपकेंद्रातील कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी आमदार सौ. मंजुळाताई गावित यांनी सांगितले की, मागील आमदारकीच्या कालावधीत शेतकर्‍यांचा जिव्हाळयाचा प्रश्न असलेल्या विजेच्या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करुन कृषी संजीवनी योजनेंतर्गत धाडणे, टिटाणे आणी वासखेडी येथे कृषी विषयक योजनेंतर्गत ३३ केव्ही क्षमतेचे विज उपकेंद्र मंजुर करुन घेतले त्यापैकी वासखेडी आणि धाडणे येथील ३३/११ केव्ही क्षमतेचे विज उपकेंद्राचे लोकार्पण ३-४ महिन्यापुर्वीच झालेले असुन आज टिटाणे येथील विज उपकेंद्राचे लोकार्पण करीत आहे. या उपकेंद्रातुन ११ केव्ही क्षमतेची पेटले परिसरातील कृषीपंपासाठी विद्युत लाईन दिलेली असुन त्यावरुन पन्हाळीपाडा, टिटाणे व पेटले परिसरातील ६०० ते ६५० शेतकर्‍यांना विज पुरवठा केला जाईल. तर याच उपकेंद्रातुन ११ केव्ही क्षमतेची दुसरी विद्युत लाईन जामदे असुन त्यावरुन परसखेड, खोरी व जामदे परिसरातील ४०० शेतक-यांना विज पुरवठा केला जाईल. तिसर्‍या ११ केव्ही. खोरी गावठाण या विद्युत लाईनवरुन आंबेमोहोर टिटाणे व खोरी या गाव परिसरातील सुमारे १०५० घरगुती ग्राहकांना २४ तास विजपुरवठा केला जाईल. थोडक्यात या टिटाणे सबस्टेशनमुळे १००० कृषीपंपांना तर १०५० घरगुती ग्राहकांना विजपुरवठा केला जाईल आणी त्यामुळे छडवेल सबस्टेशनचा विजेचा लोड कमी होईल तसेच टिटाणे परिसरातील शेतकर्‍यांचा विजेचा प्रश्न सुटणार आहे. आज टिटाणे येथील विज उपकेंद्राचे लोकार्पण करीत असतांना मला मनस्वी आनंद होत आहे. या विज उपकेंद्रावरुन येत्या २-४ दिवसांत सर्वत्र विज पुरवठा सुरु होईल. टिटाणे विज उपकेंद्रामुळे छडवेल विज उपकेंद्रावरील भार कमी होणार असुन माळमाथा परिसरातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक अडचणींवर मात करुन प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान आम्हाला होत आहे. असे युवानेता श्री. सागर गावित यांनी आपल्या भाषणात सांगितले. दिलेला शब्द आम्ही पाळला आहे तुम्हीपण आमच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन देखील सागर गावित यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande