रत्नागिरी : राजापूर पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर
रत्नागिरी, 28 डिसेंबर, (हिं. स.) : राजापूर पत्रकार संघाच्या विविध वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी आदर्श संस्था पुरस्कारासाठी येळवण येथील ग्रामीण समाज प्रबोधिनी संस्थेची निवड करण्यात आली आहे. पत्रकार दिनाचे औचित्य साधून येत्या ६
रत्नागिरी : राजापूर पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर


रत्नागिरी, 28 डिसेंबर, (हिं. स.) : राजापूर पत्रकार संघाच्या विविध वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी आदर्श संस्था पुरस्कारासाठी येळवण येथील ग्रामीण समाज प्रबोधिनी संस्थेची निवड करण्यात आली आहे.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून येत्या ६ जानेवारी रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. राजापूर व संगमेश्वर तालुक्यात ग्रामीण भागात मुलांना माध्यमिक शिक्षणाची सुविधा निर्माण करणारे चंदूभाई देशपांडे यांच्या ग्रामीण समाज प्रबोधिनी संस्था आदर्श संस्था पुरस्काराची मानकरी ठरली आहे. आदर्श वैद्यकीय सेवा पुरस्कार गेली अनेक दशके वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. पी. एस. बावकर यांना, कृषीविषयक पुरस्कार पंचगव्य आणि गोधन संरक्षण कामासाठी सोलगाव येथील सौ. सई सुहास पंडित यांना तर आदर्श शिक्षक पुरस्कार प. विश्वनाथ विद्यालय राजापूर क्र. १ च्या मुख्याध्यापिका श्रीमती अक्षता रहाटे यांना देण्यात येणार आहे.

राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande