
परभणी, 28 डिसेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यात रेशनच्या काळा बाजार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. यापूर्वी रेशनचा काळा बाजार करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. छोट्या गाड्यांचा वापर करुन हा रेशनचा काळा बाजार सुरू आहे. रविवारी नवा मोंढा पोलीस ठाण्यातील एका कर्मचार्यांने औद्योगिक वसाहतीमध्ये गाडी थांबवली. एक अधिकारी व पोलीस कर्मचार्यांनी गाडीत असलेल्या मालाची कागदपत्रे तपासली. पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांनी गाडी पोलीस ठाण्यात लावण्याचे सांगितले आहे, असे म्हणून गाडी त्या ठिकाणावरुन हलविली. या ठिकाणी काही कामगारानी देखील ही घटना पाहीली. घटनास्थळावरुन गाडी पोलीस ठाण्यात लावण्याच्या उद्देशाने नेतांना रस्त्यामध्येच गाडी ठाण्यात न घेवून जाता सोडून दिल्याचा प्रकार घडला. या संदर्भात पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मांजरमकर यांना विचारले असता गाडीतील मालाचे कागदपत्रे बरोबर होते, म्हणून गाडी सोडल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis