डोंबिवलीत इच्छुक उमेदवारांची फॉर्म भरण्यासाठी लगीनगाई!
डोंबिवली, 29 डिसेंबर (हिं.स.)।कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सोमवारी विविध पक्षातील इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली. यावर्षी डोंबिवली व डोंबिवली ग्रामीण विभागासाठी चार ठिकाणी निवडणूक अर्ज दाखल करून घेण्यासाठी व्यवस्था करण
Photo 2


डोंबिवलीत इच्छुक उमेदवारांची फॉर्म भरण्यासाठी लगीनगाई!


डोंबिवली, 29 डिसेंबर (हिं.स.)।कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सोमवारी विविध पक्षातील इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली. यावर्षी डोंबिवली व डोंबिवली ग्रामीण विभागासाठी चार ठिकाणी निवडणूक अर्ज दाखल करून घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्व, पश्चिम प्रभागक्षेत्र कार्यालय तसेच डोंबिवली ग्रामीण कार्यालय आणि केडीएमसी संकुल अशा ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जात आहेत. निवडणूक कार्यालय मुख्य अधिकारी यांच्या निर्देशानुसार काम सुरळीत होत आहे. मात्र पक्षांनी उमेदवारांना पक्षाचा ए बी फॉर्म दिला का अशा गोष्टी गुलदस्त्यातच आहेत. त्यामुळे जवळजवळ सर्व इच्छुकांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

डोंबिवली पश्चिम विभागातील ह प्रभागक्षेत्र कार्यालयात भाजपाचे उमेदवार तथा माजी स्थायी समिती सभापती दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी फॉर्म भरताना शक्ती प्रदर्शन केले. ठाकुरवाडीतील वैभव मंगल कार्यालय येथून तमाम कार्यकर्त्यांसह साथीला प्रभागातील शेकडो नागरिकांना बरोबर घेऊन मिरवणुकीसह पालिकेच्या ह प्रभागक्षेत्र कार्यालयात दाखल होत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक जयेश पुंडलिक म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या शिवाय इतर इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मात्र यामध्ये किती जणांना ए बी फॉर्म मिळाले आहेत ते गुलदस्त्यातच आहे. यामुळे पक्षाचा नक्की कोणत्या उमेदवाराचे अर्ज दाखल केला हे आजतरी कोड्यातच आहे.

सुनील नगर येथील महापालिकेच्या ग प्रभाग कार्यालयात पूर्व तसेच पश्चिम विभागातील इच्छुकांनी अर्ज दाखल केले. पी अँड टी कॉलनी येथील स्वामी समर्थ मठ येथील स्वामीचे यथासांग दर्शन घेऊन मनसेचे अधिकृत उमेदवार योगेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मनसैनिकांसह प्रभागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे स्वतः माजी आमदार तथा मनसे नेते राजू पाटील यांच्यासह पदाधिकारी व योगेश पाटील यांचे कुटुंबीय यावेळी हजर होते. अर्ज दाखल केल्या नंतर महापालिकेत आमचाच महापौर बसणार असे सांगायला योगेश पाटील विसरले नाहीत. सुनीलनगर येथे भाजपाचे माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे, शिवसेना (शिंदे गट) माजी स्थायी समिती सभापती रमेश सुकऱ्या म्हात्रे, माजी नगरसेवक संजय पावशे, रविना अमर माळी, रणजीत जोशी, वृषाली रणजीत जोशी असे विविध पक्षातील इच्छुकांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी हजेरी लावली. यामध्ये काही जणांनी वाजतगाजत अर्ज दाखल केले तर काही गुपचुप अर्ज दाखल असे का याची उत्तरे मात्र कोणीही इच्छुक उमेदवार देऊ शकला नाही. मात्र मनसे अधिकृत उमेदवारांनी आम्ही निश्चीत विजय संपादन करणार अशा प्रतिक्रिया दिल्या.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande