अमरसिंह पंडितांच्या हत्येचा होता कट; स्वीय सहायकाचा खळबळजनक दावा
गेवराईमध्ये पंडित विरुद्ध पवार हा संघर्ष बीड, 3 डिसेंबर (हिं.स.)। बीड जिल्ह्यात किरकोळ घटना वगळता नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी शांततेत मतदान पार पडले. मात्र, बीड जिल्ह्यातील गेवराई येथे अमरसिंह पंडित आणि पवार यांच्या समर्थकांमध्ये वाद उफ
अमरसिंह पंडितांच्या हत्येचा होता कट; स्वीय सहायकाचा खळबळजनक दावा


गेवराईमध्ये पंडित विरुद्ध पवार हा संघर्ष

बीड, 3 डिसेंबर (हिं.स.)।

बीड जिल्ह्यात किरकोळ घटना वगळता नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी शांततेत मतदान पार पडले. मात्र, बीड जिल्ह्यातील गेवराई येथे अमरसिंह पंडित आणि पवार यांच्या समर्थकांमध्ये वाद उफाळल्याचं पाहायला मिळाले. गेवराईतील राड्यात जखमी झालेले माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांनी रुग्णालयातील माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, गेवराई येथे मतदानादिवशी झालेल्या राड्याबाबत त्यांनी सखोलपणे भाष्य करत भाजप नेते आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत खळबळजनक दावा केला आहे.

नगरपालिका निवडणुकी दरम्यान गेवराईमध्ये पंडित विरुद्ध पवार हा संघर्ष पाहायला मिळाला. गेवराई येथील निवडणुकीदरम्यान पवार आणि पंडित कुटुंबातील सदस्य एकमेकांना भिडले. त्यातून मतदानच्या दिवशी मोठा वाद उफाळून आला. या घटनेत माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांना जबर मारहाण झाली. सध्या त्यांच्यावर बीडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच दरम्यान बोलताना डावखर यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट रचल्याचा खळबळ जनक दावा केला आहे.

गेवराईमध्ये मारहाणीची घटना ज्यावेळेस घडली, त्यावेळी मी गेवराईमधील कार्यालयात होतो. याच दरम्यान पाच ते सहा जण तिथे आले, ते सर्वजण अमरसिंह पंडित यांच्या खुनाच्या इराद्याने तिथे आले होते. गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांच्यासोबत होते, त्यांची गाडी त्यांनी थेट आमच्या कार्यालयावर आदळली. त्यानंतर, तिथे आल्यानंतर अमरसिंह पंडित यांना संपवून टाकायचं असे त्यांनी म्हटलं, ते नाहीत म्हणून मला संपवून टाकू असेही त्यांनी म्हटल्याचा खळबळजनक आरोप डावखर यांनी केला आहे. तसेच, काठी, बेल्ट, लाथ्या, बुक्याने मला मारहाण केली, असेही त्यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande