सोलापूूर - उर्दू शाळेतील गोंधळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हे
सोलापूर, 3 डिसेंबर, (हिं.स.)। पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता भालके तसेच भगीरथ भालके यांनी ईव्हीएम मशीनवर काही खुणा असल्याचा संशय व्यक्
सोलापूूर - उर्दू शाळेतील गोंधळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हे


सोलापूर, 3 डिसेंबर, (हिं.स.)। पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता भालके तसेच भगीरथ भालके यांनी ईव्हीएम मशीनवर काही खुणा असल्याचा संशय व्यक्त केला होता. या आरोपांवरून दोघांनी मतदान केंद्रातील नियमानुसार कृती होत नसल्याचे सांगत मोठा गदारोळ केला. या घटनेदरम्यान त्यांच्या सोबत आलेल्या पाच जणांनी थेट मतदान केंद्रात अनधिकृत प्रवेश केल्याचा आरोप आहे.

घटनेची सविस्तर माहिती अशी की, उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रणिता भालके मतदानाची पाहणी करण्यासाठी केंद्रात अधिकृतपणे गेल्या होत्या. त्यांच्यासोबत काही कार्यकर्तेही असल्याची माहिती मिळली. मात्र, अधिकृत परवानगी फक्त प्रणिता भालके यांना होती, इतर पाच जणांकडे प्रवेशाची कोणतीही परवानगी नव्हती.

केंद्रप्रमुख दशरथ मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, हे पाच जण विनापरवाना मतदान केंद्रात शिरले आणि मतदान प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी सर्वात महत्त्वाचे मानले जाणारे ईव्हीएम मशीनचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मतदान केंद्रातील पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी गोंधळ घालत जबरदस्तीने केंद्रात प्रवेश केल्याचा आरोप आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande