नांदगावच्या नगराध्यक्ष पदभार स्वीकारण्याआधी ॲक्शन मोडवर
अमरावती, 30 डिसेंबर (हिं.स.) नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ प्राप्ति मारोटकर व नगरसेवकांनी पदभार स्वीकारण्या आधीच ॲक्शन मोडवर नगरपंचायत कार्यालयात सकाळी १० वाजताच झाडाझडती घेऊन विनापरवानगी गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन विना पगारी करण्याचे
नांदगावच्या नगराध्यक्ष पदभार स्वीकारण्याआधी ॲक्शन मोडवर


अमरावती, 30 डिसेंबर (हिं.स.) नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ प्राप्ति मारोटकर व नगरसेवकांनी पदभार स्वीकारण्या आधीच ॲक्शन मोडवर नगरपंचायत कार्यालयात सकाळी १० वाजताच झाडाझडती घेऊन विनापरवानगी गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन विना पगारी करण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले त्यामुळे न.पं. कर्मचाऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांनी नगरपंचायत कार्यालयात सकाळी अचानक धडक देऊन कार्यालयाची पाहणी केली यावेळी मुख्याधिकारी सुट्टीवर असल्याने न.पं. कार्यालयातील अनेक कर्मचारी विनापरवानगी गैरहजर आढळून आले त्यांना लगेच कारणे दाखवा नोटीस देऊन विना पगारी करण्यात आले.तसेच लाखो रुपये खर्च करून कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड निर्माण केले मात्र सदर डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे अस्तव्यस्थ झाले आहे यावेळी आधुनिक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट करण्याचे निर्देश दिले तसेच नांदगाव शहराला पाणीपुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली यावेळी पाणी स्वच्छ होत नसल्याची बाब निर्देशनांस आली सदर जल शुद्धीकरण केंद्रात योग्य त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले पाणी पुरवठा,स्वच्छता, आरोग्य इत्यादी विभागाचा मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीतच आढावा घेण्यात आला बस स्थानक परिसरातील शौचालयाची दुर्गंधी पाहून नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना चांगले धारेवर धरत चांगलीच कानउघाडणी केली यावेळी नगरसेवक प्रकाश मारोटकर, प्रीती इखार, कांता लोमटे, वसुदेव लोखंडे, राष्ट्रवादीचे मो.साजिद इत्यादी उपस्थित होते.

*जलशुद्धीकरण केंद्रातील धक्कादायक बाब उघड मशीनरी बंद.*

नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली असता पाणी स्वच्छ करणाऱ्या बहुतांश मशीनरीच बंद असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. यावेळी पाणी पुरवठा कर्मचारी निरुत्तर झाले तात्काळ उपाय योजना करण्याचे निर्देश दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande