छ. संभाजीनगर जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५ प्रकाशित
छत्रपती संभाजीनगर, 30 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा सांख्यिकी विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५ पुस्तिकेचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. जिल्हा सांख्यिकी कार्य
वर्षभरातील कामगिरी


छत्रपती संभाजीनगर, 30 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा सांख्यिकी विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५ पुस्तिकेचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक श्रीमती शी.वै. मिसाळ, सांख्यिकी अधिकारी न.ज.कदम, सांख्यिकी सहाय्यक श्रीमती नि.न. भिडे यावेळी उपस्थित होते. नियोजन विभागांतर्गत अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने हे समालोचन दरवर्षी प्रकाशित होत असते.त्यात सर्व शासकीय कार्यालये, संलग्न कार्यालये, संस्था, समित्या यांच्या वर्षभरातील कामगिरी संदर्भात माहिती प्रसिद्ध केली जाते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande