नांदेड - नाहरकत प्रमाणपत्र काढण्यासाठी १ कोटी ७० लाखांचा मालमत्ता, पाणी कर भरला
नांदेड, 30 डिसेंबर, (हिं.स.)। नांदेड महापालिकेच्या निवडणुकीसाठी आवश्यक असणारे नाहरकत प्रमाणपत्र, शौचालय वापर प्रमाणपत्र काढण्याची इच्छूक उमेदवारांनी गर्दी केली . मालमत्ता व पाणीपट्टी कर भरल्याशिवाय नाहरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने इच्छूक उमेदवारां
नांदेड - नाहरकत प्रमाणपत्र काढण्यासाठी १ कोटी ७० लाखांचा मालमत्ता, पाणी कर भरला


नांदेड, 30 डिसेंबर, (हिं.स.)। नांदेड महापालिकेच्या निवडणुकीसाठी आवश्यक असणारे नाहरकत प्रमाणपत्र, शौचालय वापर प्रमाणपत्र काढण्याची इच्छूक उमेदवारांनी गर्दी केली . मालमत्ता व पाणीपट्टी कर भरल्याशिवाय नाहरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने इच्छूक उमेदवारांनी आतापर्यंत १ कोटी ७० लाख ९२ हजार ४५९ रुपयांचा कराचा भरणा केला आहे.

महापालिकेकडे १ हजार २०० पेक्षा अधिक नाहरकत प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली आहे. जे इच्छूक उमेदवार निवडणूक लढवित आहेत त्यांच्या नावावरील मालमत्तेचा कर आणि पाणीपट्टी निरंक असल्याशिवाय नाहरकत प्रमाणपत्र मिळत नाही. जवळपास २४ विभागाकडे नाहरकत प्रमाणपत्राच्या अभिप्रायानंतर नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येते. आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांच्या नियंत्रणाखाली एकुण सहा झोनमध्ये १ हजार ४४२ मालमत्ताधारकांनी १ कोटी ३ १ लाख ७८ हजार ४९४ रुपये कर भरला आहे. तर ४३७पाणीपट्टीधारकांनी ३९ लाख १३ हजार ४६५ रुपयांचा पाणीकर भरला आहे. असे एकुण १ कोटी ७० लाख ९२ हजार ४५९ रुपयांचा मालमत्ता व पाणी कर भरून नाहरकत प्रमाणपत्र घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande