भाजप नेते सुधाकर पांढरे काँग्रेसमध्ये
नांदेड, 30 डिसेंबर (हिं.स.)। भाजपचे नेते नांदेडचे प्रथम महापौर सुधाकर भाऊ पांढरे यांनी माजी मंत्री माणिकराव ठाकरे आणि नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रा रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. नांदेड महानगरपालिकेच्या निव
भाजपचे नेते नांदेडचे प्रथम महापौर सुधाकर भाऊ पांढरे


नांदेड, 30 डिसेंबर (हिं.स.)।

भाजपचे नेते नांदेडचे प्रथम महापौर सुधाकर भाऊ पांढरे यांनी माजी मंत्री माणिकराव ठाकरे आणि नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रा रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सह भारतीय जनता पक्ष शिवसेनेत प्रवेश केला जात आहे. पक्षाच्या वतीने तिकीट न मिळणे किंबहुना डावलने या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश केला जात आहे नांदेडमध्ये माजी महापौर सुधाकर पांढरे यांनी देखील काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला

या प्रसंगी,नांदेड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश‌ पावडे, हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब,महेश भाऊ देशमुख,सुरेश दादा हटकर,संजय कवठेकर,आदी मान्यवर उपस्थित होते

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande