
जळगाव , 30 डिसेंबर (हिं.स.) रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहेत. या बदलांचा परिणाम लांब पल्ल्याच्या, मेल–एक्सप्रेस तसेच काही प्रवासी गाड्यांवर होणार आहे. यातील अनेक गाड्या भुसावळ आणि जळगाव मार्गे धावणाऱ्या आहे. त्यामुळे स्टेशनवर जाण्याआधी कोणत्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहेत .
रेल्वेने स्पष्ट केले की हे सुधारित वेळापत्रक ऑपरेशनल सोयीसाठी आणि तांत्रिक कारणांसाठी लागू करण्यात आले आहे. प्रवाशांना नवीन वेळापत्रकाबद्दल सविस्तर माहिती १३९ या रेल्वे चौकशी क्रमांकावर कॉल करून, नॅशनल ट्रेन चौकशी प्रणाली (NTES) अॅप वापरून किंवा रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन मिळू शकते असे देखील रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.१ जानेवारी २०२६ पासून अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार असून यात भुसावळ आणि जळगावमार्गे धावणाऱ्या काही गाड्यांचा समावेश आहे. त्यात हावडा- लोकमान्य टिळक समरसत्ता एक्स्प्रेस, हावडा -लोकमान्य टिळक ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, हावडा- पोरबंदर ओखा एक्स्प्रेस, हावडा – मुंबई सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेस, पुणे- हावडा आझाद हिंद एक्सप्रेसचा समावेश आहे ट्रेन क्रमांक १२१५२ हावडा- लोकमान्य टिळक समरसत्ता एक्स्प्रेस हावडा स्टेशनवरून संध्याकाळी ७:३५ ऐवजी संध्याकाळी ७:२५ वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक २२८३० शालीमार -भुज सुपरफास्ट एक्स्प्रेस शालीमार स्टेशनवरून संध्याकाळी ७:५५ ऐवजी ७:५० वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक २०९७२ शालीमार -उदयपूर एक्स्प्रेस शालीमार स्टेशनवरून संध्याकाळी ७:५५ ऐवजी ७:५० वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक १२१०२ हावडा -लोकमान्य टिळक ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस हावडा स्टेशनवरून रात्री ८:२० ऐवजी रात्री ८:१५ वाजता सुटेल. ट्रेन गाडी क्रमांक १२९०६ हावडा- पोरबंदर ओखा एक्स्प्रेस हावडा स्टेशनवरून रात्री ८:२० ऐवजी रात्री ८:१५ वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक २२९०६ शालीमार – ओखा सुपरफास्ट एक्स्प्रेस ही शालीमार स्टेशनवरून रात्री ८:२० ऐवजी रात्री ८:१५ वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक १२२६२ हावडा – मुंबई सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेस हावडा स्टेशनवरून सकाळी ५:४५ ऐवजी सकाळी ०५:३५ वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक १२८१३ हावडा- टाटानगर स्टील एक्स्प्रेस हावडा स्टेशनवरून सायंकाळी ५:२० ऐवजी ५:१० वाजता निघेल. ट्रेन क्रमांक १८०११ हावडा- आद्रा चक्रधरपूर एक्स्प्रेस रात्री ११:३५ ऐवजी रात्री ११:३० वाजता हावडा स्टेशनवरून सुटेल. ट्रेन क्रमांक १८०५० बदामपहार – शालीमार साप्ताहिक एक्सप्रेस सकाळी ६ ऐवजी सकाळी ६:१५ वाजता शालीमार स्थानकावर पोहोचेल. १२१२९ पुणे- हावडा आझाद हिंद एक्सप्रेस सकाळी ५:१० ऐवजी सकाळी ५:२५ वाजता हावडा स्थानकावर पोहोचेल. ट्रेन क्रमांक १८०१२ चक्रधरपूर – आद्रा – हावडा एक्स्प्रेस सकाळी ५:२५ ऐवजी सकाळी ५:३५ वाजता हावडा स्टेशनवर पोहोचेल. ट्रेन क्रमांक २०८९४ पाटणा – टाटानगर वंदे भारत एक्स्प्रेस टाटानगर स्टेशनवर ९:३० ऐवजी ९:४० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक १८१८५ टाटानगर – गोड्डा एक्स्प्रेस ही टाटानगर स्टेशनवरून दुपारी २ ऐवजी दुपारी १:५५ वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक २०८९१ टाटानगर – ब्रह्मपूर वंदे भारत एक्स्प्रेस टाटानगर स्टेशनवरून दुपारी २:३० ऐवजी २:२० वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक २०८९२ ब्रह्मपूर – टाटानगर वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी २:४० ऐवजी दुपारी २:५० वाजता टाटानगर स्टेशनवर पोहोचेल. ट्रेन क्रमांक १८११७ राउरकेला – गुणुपूर राज्यराणी एक्स्प्रेस राउरकेला स्टेशनवरून रात्री ९:२५ ऐवजी रात्री ९:२० वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक १८१२५ राउरकेला – पुरी एक्स्प्रेस ही राउरकेला स्टेशनवरून सकाळी ८ ऐवजी सकाळी ७:५० वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक १८१०५ राउरकेला – जयनगर एक्स्प्रेस ही राउरकेला स्थानकावरून दुपारी ४:४५ ऐवजी दुपारी ४:३५ वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक १८११८ गुणुपूर – राउरकेला राज्य राणी एक्सप्रेस सकाळी ८:१५ ऐवजी सकाळी ८:३० वाजता राउरकेला स्थानकावर पोहोचेल. ट्रेन क्रमांक ६८०३० झारसुगुडा – राउरकेला मेमू सकाळी ११:२५ ऐवजी ११:३० वाजता राउरकेला स्टेशनवर पोहोचेल. ट्रेन क्रमांक ६८०२६ राउरकेला- चक्रधरपूर सारंडा मेमू राउरकेला स्थानकावरून संध्याकाळी ४:२० ऐवजी ४ वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक ५८०२७ खरगपूर – राउरकेला पॅसेंजर ट्रेन राउरकेला स्थानकावर सायंकाळी ७:१० ऐवजी सायंकाळी ७:४० वाजता पोहोचे
ट्रेन क्रमांक १८११६ चक्रधरपूर – गोमोह मेमू एक्स्प्रेस दुपारी १:२० ऐवजी दुपारी १:३० वाजता गोमोह स्थानकावर पोहोचेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर