
छत्रपती संभाजीनगर, 30 डिसेंबर (हिं.स.)। हिंगोली जिल्ह्यात आज मंगळवारी सकाळी पाच वाजून 55 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे भूकंपाचे केंद्र आहे. पांगरा शिंदे पासून जवळपास दहा किलोमीटर पर्यंत भूकंपाचा हादरा जाणवला आहे. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
दरम्यान, आज मंगळवारी सकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला असून याची 3.5 रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे. तालुक्यातील पांगरा शिंदे हे गाव भूकंपाचे केंद्रबिंदू असून या परिसरापासून जवळपास दहा किलो मीटर अंतरावर भूकंपाचा धक्का जाणवला. विशेष म्हणजे मागील दोन-तीन दिवसांपासून जिल्हाभरात पुन्हा एकदा गारठा जाणवत जाणवत आहे.
भूकंपाचा धक्का जाणवला त्यावेळेस पांगरा शिंदे गावासह आजूबाजूचे नागरिक गुलाबी थंडीच्या साखर झोपेत होते. जमीनीतून हादरा जाणवत घरांच्या खिडक्यासह टीनपत्रे, सामानांचा आवाज झाला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis