रायगड - प्रभाग १६ मध्ये शिवसेना (उबाठा) ची ताकद; यतीन देशमुख यांची अधिकृत उमेदवारी
रायगड, 30 डिसेंबर, (हिं.स.)। पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पनवेल येथील प्रभाग क्रमांक १६ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार यतीन विनायक देशमुख यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे प
रायगड - प्रभाग १६ मध्ये शिवसेना (उबाठा) ची ताकद; यतीन देशमुख यांची अधिकृत उमेदवारी


रायगड, 30 डिसेंबर, (हिं.स.)। पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पनवेल येथील प्रभाग क्रमांक १६ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार यतीन विनायक देशमुख यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यतीन देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि शिवसेनेची विकासाची भूमिका पुढे नेण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी जिल्हा प्रमुख शिरीष दादा घरत, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, महानगर प्रमुख अवचित राऊत, तालुका प्रमुख संदीप तांडेल, पनवेल शहर प्रमुख प्रविण जाधव यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. सर्वांनी यतीन देशमुख यांना शुभेच्छा देत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख शिरीष दादा घरत म्हणाले की, “प्रभाग १६ मधील नागरिकांच्या समस्या, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि नागरी सुविधा यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. यतीन देशमुख हे जनतेशी सतत संपर्कात असलेले आणि काम करणारे उमेदवार आहेत.” शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पनवेल महापालिकेत मजबूत नेतृत्व उभे करण्याचा निर्धार यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.

उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रभाग १६ मध्ये निवडणुकीची रंगत वाढली असून प्रचाराला वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी संघटनात्मक ताकद वापरण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande