प्रोटीयन ई-जीओव्ही टेक्नॉलॉजीजकडून मुंबईतील साकी नाका येथे आधार सेवा केंद्राचे उद्घाटन
मुंबई, 31 डिसेंबर (हिं.स.)।लोकसंख्येच्या प्रमाणात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI) उभारण्यात अग्रेसर असलेल्या प्रोटीयन ई-गव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेडने (BSE: 544021; NSE: INE004A01022) भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (UIDAI) निर्देशांनुसार, मुंब
मुंबई


मुंबई, 31 डिसेंबर (हिं.स.)।लोकसंख्येच्या प्रमाणात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI) उभारण्यात अग्रेसर असलेल्या प्रोटीयन ई-गव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेडने (BSE: 544021; NSE: INE004A01022) भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (UIDAI) निर्देशांनुसार, मुंबईतील साकी नाका येथे नवीन आधार सेवा केंद्राच्या (ASK) शुभारंभाची घोषणा केली. शहरातील सर्वात व्यस्त निवासी आणि व्यावसायिक भागांपैकी एका भागात नागरिकांना आधार नोंदणी आणि अद्ययावत सेवांची सुलभता मिळवून देणे हा या नवीन केंद्राचा उद्देश आहे.

नव्याने सुरू झालेले आधार सेवा केंद्र हे आधार नोंदणी, भौगोलिक आणि बायोमेट्रिक अपडेट्स, आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी सेवांसह विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देईल. सातत्यपूर्ण, सुरक्षित आणि नागरिक-स्नेही अनुभव देण्यासाठी सुरू केलेल्या या केंद्राचा उद्देश आधार-संबंधित गोष्टींचे वेळेवर आणि विश्वासार्ह निराकरण सुनिश्चित करणे हे आहे.

या उद्घाटनाच्या निमित्ताने प्रोटीयन ई-गव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. सुरेश सेठी म्हणाले, “आधारशी संबंधित सर्व सेवांसाठी 'उत्कृष्टता केंद्र' (सेंटर्स ऑफ एक्सलन्स) म्हणून आधार सेवा केंद्रांचे (ASKs) देशव्यापी जाळे स्थापन करण्याच्या सरकारच्या दूरदृष्टीचे आम्ही कौतुक करतो. 188 जिल्ह्यांमध्ये आधार सेवा केंद्रे स्थापन करण्याची आणि चालवण्याची यूआयडीएआय (UIDAI) कडून प्रोटीयनला मिळालेली जबाबदारी म्हणजे मोठ्या लोकसंख्येसाठी पायाभूत सुविधा पुरवण्याच्या आमच्या क्षमतेवर झालेले शिक्कामोर्तब आहे. या कार्यक्षमतेमुळे आधार आणि पॅन ही दोन्ही मूलभूत डिजिटल ओळखपत्रे व्यवस्थापित करण्याची आणि त्यांचा विस्तार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली प्रोटीयन ही देशातील एकमेव संस्था ठरली आहे. ही दोन्ही ओळखपत्रे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा आधार आहेत. या उपक्रमाच्या व्यापकतेपलीकडे, यूआयडीएआयसोबतची आमची सामायिक वचनबद्धता दर्शवते. यामुळे या सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील याची काळजी घेतली जाते. यामुळे देशभरातील लाखो लोकांसाठी आधार अधिक सुलभ, सुरक्षित आणि नागरिक-केंद्रित बनेल.”

डीडीजी, आरओ मुंबई यांनी संचालक आणि उपसंचालक, महाराष्ट्र यांच्यासमवेत मुंबईतील साकीनाका येथील आधार सेवा केंद्राला भेट देऊन केंद्राच्या कामकाजाचा औपचारिक शुभारंभ केला. कर्मचाऱ्यांना संबोधित करताना, त्यांनी नागरिकांना सक्षमतेने आणि माणुसकी जपत सेवा देण्याच्या महत्त्वावर भर दिला. यूआयडीएआयचे प्रतिनिधी म्हणून, प्रत्येक संवादात विश्वास आणि प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, याचीही आठवण त्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना करून दिली.

यूआयडीएआय सेवांसाठी एएसकेला एक खरे उत्कृष्टता केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या प्रोटीयनच्या सक्रिय प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. तसेच कार्यान्वयन सज्जता आणि सेवेच्या गुणवत्तेप्रती असलेल्या वचनबद्धतेची त्यांनी दखल घेतली.

कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासोबतच, उपमहासंचालकांनी नव्याने कार्यान्वित झालेल्या एएसकेमधील रहिवाशांशी संवाद साधला, त्यांचे अनुभव ऐकले आणि त्यांना उपलब्ध सेवांचा पूर्णपणे वापर करण्यास प्रोत्साहित केले. त्यांच्या या साधण्यामुळे नागरिक-केंद्रित सेवा वितरणाच्या यूआयडीएआयच्या ध्येयाला बळकटी तर मिळालीच आणि एएसके हे सुलभता, कार्यक्षमतेचे एक आदर्श उदाहरण म्हणून समोर आले.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (UIDAI) प्रोटीयनला देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये आधार सेवा केंद्रे स्थापन करण्याबाबत आणि चालवण्याबाबत अलीकडेच आदेश मिळाले होते. त्यानंतरच हे उद्घाटन झाले आहे. यानुसार, प्रोटीयन देशभरातील 188 जिल्ह्यांमध्ये आधार सेवा केंद्रे सुरू करेल, ज्यामुळे या सेवा समाजाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतील आणि नागरिकांना उत्तम सेवा देण्याच्या UIDAI च्या दृष्टिकोनाला बळकटी मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande