वर्धा, 18 फेब्रुवारी (हिं.स.) : जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 55 रुग्णवाहिका कार्यरत आहे. या रुग्णावाहिकेव्दारे गरोदर मातांना प्रसुतिपूर्व तथा प्रसुती पश्चात व 0 ते 1 वर्षापर्यंतच्या नवजात आजारी बालकांना निवासस्थानापासुन ते शासकीय रुग्णालयापर्यंत, एका शासकीय रुग्णालयापासुन ते दुस-या शासकीय रुग्णालयात स्थानांतरण करण्यासाठी तसेच शासकीय रुग्णालयापासुन ते निवासस्थानापर्यंत मोफत सेवा पुरविण्यात येते.
जिल्ह्यात सन एप्रिल 2023 पासुन डिसेंबर 2024 पर्यंत 35 हजार 154 गरोदर माता व नवजात आजारी बालकांनी रुग्णवाहिकेचा घेतला लाभ घेतला. सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी शासनाच्यावतीने मोफत आरोग्य सेवा पुरविण्यासोबतच त्याच्यावर वेळेत उपचार व्हावे यासाठी मोफत रुग्णवाहिका सुध्दा शासनाच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याकरीता गरोदर माता व नवजात आजारी बालकांच्या सेवेसाठी 102 क्रमांक व आपत्कालीन सेवेसाठी 108 टोल फ्रि क्रमांक असलेल्या रुग्णवाहिका कार्यरत असून या रुग्णवाहिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. यासाठी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे एकुण 55 रुग्णवाहिका कार्यरत असून या रुग्णवाहिकेवर शासकिय व खाजगी यंत्रणेव्दारे पर्याप्त प्रमाणात वाहन चालक उपलब्ध आहे. एप्रिल 2022 ते डिसेंबर 2024 पर्यंत 10 हजार 433 गरोदर माता व नवजात आजारी बालकांना निवास ते शासकीय रुग्णालयात आनण्यासाठी, 10 हजार 79 गरोदर माता व नवजात आजारी बालकांना एका शासकीय रुग्णालयातून दुस-या शासकीय रुग्णालयात स्थानातरण करण्यासाठी तसेच 14 हजार 642 गरोदर माता व नवजात आजारी बालकांना रुग्णवाहिकेव्दारे शासकीय रुग्णालयातून निवासस्थानी पोहोचविण्यासाठी सेवा पुरविण्यात आली आहे. आपात्कालीन 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा 14 हजार रुग्णांनी घेतला लाभ आपात्कालीन सेवेसाठी जिल्ह्यात 11 रुग्णवाहिका कार्यरत असून या रुग्णवाहिकेव्दारे एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत तब्बल 14 हजार 453 रुग्णांनी मोफत रुग्णवाहिकेचा लाभ घेतला असून यामध्ये अपघात, हृदयविकास, सर्पदंश, विषबाधा, श्वासोच्छवासाचे गंभीर आजार, मेंदुशी सबंधीत गंभीर आजार, बाळंतपणातील गुंतागुंतीतील रुग्ण, नवजात अर्भकासंबधी आजार, नैसर्गिक आपत्तीतील सापडलेले रुग्ण, मानव निर्मित सापडलेले रुग्ण, जळीत रुग्ण, इत्यादी आजाराच्या रुग्णाचा समावेश आहे. नागरिकांनी आपात्कालीन परिस्थीत 108 या टोल फ्रि क्रमांवर संपर्क साधून रुग्णवाहिकेचा लाभ घ्यावा.
--------------------
हिंदुस्थान समाचार / मेघा माने