मुंबई , 4 फेब्रुवारी (हिं.स.)।भारतीय क्रिकेट संघ टी 20 मालिकेनंतर आता इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.या मालिकेतील पहिला सामना हा नागपूरमधील व्हीसीए स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.यासाठी टीम इंडियाने नागपुरात सरावाला सुरुवात केली आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी सांगितलं होतं. मात्र त्यानंतरही बुमराह इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी फिट नसूनही त्याचा संघात समावेश करण्यात आला.बीसीसीआय निवड समितीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी एकत्र संघ जाहीर केला. दोन्ही संघ सारखेच आहेत. मात्र वनडे सीरिजमध्ये बुमराह खेळणार नाही आहे. बीसीसीआय निवड समितीने बुमराहचा बॅकअप म्हणून हर्षित राणा याचा एकदिवसीय संघात समावेश केला होता.त्यामुळे आता बुमराह च्या जागी हर्षित राणा हा खेळताना दिसणार आहे.
जसप्रीत बुमराह याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. बुमराहला या दुखापतीमुळे सामना सोडून मैदानाबाहेर जावं लागलं होतं. बुमराहला पाठीत झालेल्या त्रासमुळे दुसऱ्या डावात बॉलिंगही करता आली नव्हती. त्यानंतर आता बुमराह स्कॅनसाठी आणि या दुखापतीतून पूर्णपणे फिट होऊन कमबॅक करण्यासाठी नॅशनल क्रिकेट एडेकमीत गेला आहे. दुखापत झाल्यानंतर भारतीय खेळाडूंना रिहॅबसाठी एनसीएत जावं लागतं. तिथे खेळाडूंवर आवश्यक उपचार दिले जातात. खेळाडूंवर वैद्यकीय पथक लक्ष देतं. सर्वकाही व्यवस्थित झाल्यावर खेळाडूला एका टेस्ट द्यावी लागते त्यानंतर एनसीएकडून खेळाडू पूर्णपणे फिट असल्याचं जाहीर करते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode