रवी शास्त्रींकडे इंग्लंडच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवा : मोंटी पानेसर
नवी दिल्ली, 25 डिसेंबर (हिं.स.)इंग्लंड संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे, जिथे पाच सामन्यांची प्रतिष्ठित अ‍ॅशेस मालिका सुरू आहे. पहिल्या तीन सामन्यांमधील तिन्ही सामने गमावल्यानंतर इंग्लंड संघाने मालिका गमावली आहे. त्यानंतर त्यांच्यावर व्यापक टीका होत आहे.
रवि शास्त्री


नवी दिल्ली, 25 डिसेंबर (हिं.स.)इंग्लंड संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे, जिथे पाच सामन्यांची प्रतिष्ठित अ‍ॅशेस मालिका सुरू आहे. पहिल्या तीन सामन्यांमधील तिन्ही सामने गमावल्यानंतर इंग्लंड संघाने मालिका गमावली आहे. त्यानंतर त्यांच्यावर व्यापक टीका होत आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी तर सध्याचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांना हटवण्याची मागणी केली आहे. क्रिकेटप्रेमींचा असा विश्वास आहे की, त्यांच्या रणनीती आता काम करत नाहीत, म्हणूनच संघाला एकामागून एक पराभव सहन करावा लागत आहे.

मॅक्युलमवर सुरू असलेल्या टीकेदरम्यान, एक विधान समोर आले आहे.ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले आहे. अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमधील पराभवानंतर, मोंटी पानेसर यांनी इंग्लंड क्रिकेटमध्ये बदल घडवून आणण्याची मागणी केली आहे. त्यांनी मॅक्युलमच्या जागी रवी शास्त्री यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करावे असे सुचवले आहे.

पानेसर यांनी त्यांचे मत मांडले की, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे सध्याचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या जागी एक आदर्श उमेदवार असू शकतात. पनेसर यांनी रवी शास्त्री यांच्या अविश्वसनीय विक्रमाचे उदाहरण म्हणून प्रकाश टाकला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने २०१८-१९ आणि २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकल्या होत्या.

पानेसर म्हणाले, ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याचा योग्य मार्ग कोणाला माहित आहे याचा विचार तुम्हाला करावा लागेल? ऑस्ट्रेलियाच्या मानसिक, शारीरिक आणि धोरणात्मक कमकुवतपणाचा तुम्ही कसा फायदा घेऊ शकता? मला वाटते की रवी शास्त्री हे इंग्लंडचे पुढील मुख्य प्रशिक्षक असावेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande