मुंबई, 4 फेब्रुवारी (हिं.स.)।
मध्य रेल्वे प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळा- २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि बनारस तसेच नागपूर आणि दानापूर दरम्यान ८ अतिरिक्त विशेष सेवा चालवणार आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेत :
१) लोकमान्य टिळक टर्मिनस - बनारस कुंभमेळा विशेष (४ सेवा)
01031 कुंभमेळा विशेष गाडी दि. ०५.०२.२०२५ आणि दि. ०८.०२.२०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.०५ वाजता सुटेल आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी ०६.४५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)
01032 कुंभमेळा विशेष ट्रेन दि. ०६.०२.२०२५ आणि दि. ०९.०२.२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता बनारस येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १६.४० वाजता पोहोचेल. (२ सेवा)
थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर आणि चुनार.
संरचना : दोन वातानुकूलित द्वितीय, सहा वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ६ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.
२) नागपूर - दानापूर कुंभमेळा विशेष (दोन ट्रेन आणि ४ सेवा)
ट्रेन क्रमांक 01201/01202
01201 कुंभमेळा विशेष गाडी ०५.०२.२०२५ रोजी नागपूर येथून दुपारी १२.०० वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी ११.५० वाजता पोहोचेल. (१ सेवा)
01202 कुंभमेळा विशेष गाडी ०६.०२.२०२५ रोजी दानापूर येथून दुपारी २.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ११.४० वाजता पोहोचेल. (१ सेवा)
ट्रेन क्रमांक 01203/01204
01203 कुंभमेळा विशेष ट्रेन ०८.०२.२०२५ रोजी दुपारी ३ वाजता नागपूर येथून सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता पोहोचेल. (१ सेवा)
01204 कुंभमेळा विशेष ट्रेन ०९.०२.२०२५ रोजी दुपारी २.३० वाजता दानापूर येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ११.४० वाजता पोहोचेल. (१ सेवा)
थांबे : गोंदिया, बालाघाट, नैनपूर, घानसोर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, चुनार, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना : दोन प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, एक वातानुकूलित द्वितीय, २ द्वितीयसह तृतीय वातानुकूलित, ९ वातानुकूलित तृतीय, ४ शयनयान आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
आरक्षण : कुंभमेळा विशेष ट्रेन क्रमांक 01031, 01201 आणि 01203 साठी सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर विशेष शुल्कासह बुकिंग सुरू आहे.
या विशेष गाड्यांमध्ये, सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित कोच म्हणून चालवले जातील आणि तिकिटे यूटीएस द्वारे बुक करता येतील.
या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने