
मुलीच्या वडिलांनी व्यक्त केला लव्ह जिहादचा संशयभोपाळ, 12 मार्च (हिं.स.) : गेल्या वर्षी उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ मेळ्यात सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली मोनालिसा भोसले या तरुणीने केरळच्या फरमान खान नामक इसमाशी विवाह केला आहे. मोनालिसाच्या वडिलांनी इच्छेविरुद्ध झालेल्या या विवाहाचा विरोध केलाय. तसेच हा लव्ह जिहाद असल्याचा संशय व्यक्त करत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे मुलीला सोडवून आणण्यासाठी मदत मागितली आहे.
मध्यप्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील महेश्वर इथल्या पर्यननगरची रहिवासी असलेली मोनालिसा प्रयागराज महाकुंभात रुद्राक्ष व माळा अशा धार्मिक वस्तूंची विक्री करायची. अतिशय सौंदर्यवती असलेली मोनालिसा आपल्या निळ्या डोळ्यांमुळे रातोरात सोशल मिडीयावर व्हायरल होऊन देशभर लोकप्रिय झाली होती. मोनालिसाच्या वडिलांनी सांगितले की, गेल्या 2 मार्च रोजी काही लोक केरळहून आले होते, ज्यांनी त्यांच्या मुलीला चित्रपटात काम मिळवून देण्याचे व अभिनय शिकवण्याचे आश्वासन दिले.मोनालिसा त्या लोकांसोबत केरळला गेली, पण तिथेच त्यापैकी फरमान खानशी विवाह केला. वडिल जयसिंह भोंसले यांनी सांगितले की, त्यांनी हे रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु मोनालिसा परत येण्यास तयार झाली नाही. त्यांनी केरलच्या संपन्नूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली, पण पोलीसांनी सांगितले की मोनालिसा 18 वर्षांची असून तिच्या इच्छेप्रमाणे विवाह करण्यास ती सक्षम आहे.
जयसिंह भोंसले म्हणाले की, आम्ही फार शिक्षित नाही, समजत नाही हे कसे घडले. कदाचित तिच्यावर जादू-टोणाचा परिणाम झाला असेल. तसेच मोनालिसाला चित्रपट ‘द डायरी ऑफ मणिपुर’ मध्ये साइन केल्यामुळे मिळालेली रक्कम घरासाठी वापरण्याऐवजी तिच्या ट्रेनिंग आणि रहाण्याच्या खर्चात गेली. मी आशा घेऊन गेलो होतो की माझी मुलगी दोन-तीन चित्रपटांत काम करत असेल, पण अचानक तिला फसवून तिथून घेऊन गेले.मोनालिसाच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु