नवी
दिल्ली, 04 फेब्रुवारी (हिं.स.) : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्ली पोलिसांनी
मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोविंदपुरीतील गोंधळामुळे
मुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांवर आदर्श
आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. तसेच आम
आदमी पार्टीच्या समर्थकांवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दिल्ली निवडणुकीच्या
प्रचाराचा सोमवारी शेवटचा दिवस होता. संध्याकाळी
5 वाजता प्रचार थांबल्यानंतरही आम आदमी
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रात्रीपर्यंत प्रचार सुरू ठेवला. त्यामुळे अनेक भागात
गोंधळ उडाला. त्यानंतर गोविंदपुरी पोलिसांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल
केला.यासंदर्भात दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी की 4 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12.30
वाजता, कालकाजी
(एसी-51) येथील आप उमेदवार
आतिशी 60 ते 70 लोक आणि 10 वाहनांसह फतेह सिंग मार्गावर होत्या. एफएसटीच्या
तक्रारीवरून, गोविंदपुरी पोलीस
ठाण्यात कलम 223 बीएनएस आणि 126 आरपी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
---------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी