महाकुंभ:पंतप्रधानांचे संगमावर पवित्र स्नान
प्रयागराज, 05 फेब्रुवारी (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी सहभागी झाले. पंतप्रधानांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान आणि पूजा केली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थि
पंतप्रधानांचे महाकुंभात पवित्र स्नान


प्रयागराज, 05 फेब्रुवारी (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी सहभागी झाले. पंतप्रधानांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान आणि पूजा केली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. त्यानंतर मोदी यांनी बोटीतून कुंभमेळ्याची पाहाणी केली.

पंतप्रधानांचे आज, बुधवारी सकाळी 10 वाजता प्रयागराज विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर 10.45 वाजता ते अरेल घाटावर पोहोचले. तेथून ते बोटीतून महाकुंभमेळ्यात दाखल झाले. यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी 77 देशांच्या 118 सदस्यांच्या राजदुतांच्या शिष्टमंडळाने महाकुंभात पवित्र स्नान केले होते. यात रशिया, मलेशिया, बोलिविया, झिम्बाब्वे, लातविया, उरुग्वे, नेदरलँड, मंगोलिया, इटली, जपान, जर्मनी, जमैका, अमेरिका, स्वित्झर्लंड, स्वीडन, पोलंड, कॅमेरुन, युक्रेन आणि अर्जेंटिना या देशांच्या राजदुतांचा समावेश होता. उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 13 जानेवारीपासून सुरु झालेल्या या महाकुंभमेळ्यात 4 फेब्रुवारीपर्यंत 38.29 कोटी भाविकांनी संगमात पवित्र स्नान केले आहे. दरम्यान आगामी 10 फेब्रुवारी रोजी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाकुंभात स्नान करणार आहेत. -------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande