धुळे - जिल्हा क्रीडा संकुल आजपासून 5 दिवस राहणार बंद
धुळे, 4 फेब्रुवारी (हिं.स.)।नाशिक विभागस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, धुळे येथे 7 ते 9 फेब्रुवारी, 2025 दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा संकुल, वाडीभोकर रोड, धुळे येथील संपुर्ण मैदा
धुळे - जिल्हा क्रीडा संकुल आजपासून 5 दिवस राहणार बंद


धुळे, 4 फेब्रुवारी (हिं.स.)।नाशिक विभागस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, धुळे येथे 7 ते 9 फेब्रुवारी, 2025 दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा संकुल, वाडीभोकर रोड, धुळे येथील संपुर्ण मैदान, इनडोअर हॉल हे खेळाडू, नागरिक तसेच पोलीस भरती सराव करणाऱ्यांसाठी 5 ते 9 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत बंद राहणार आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.टिळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा आणि कर्मचाऱ्यांतील खेळाडू वृत्तीची जोपासना व्हावी, या हेतूने शासनाकडून प्रतिवर्षी राज्यस्तरीय महसुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यानुसार सन 2024-2025 या वर्षांत होणाऱ्या नाशिक विभागस्तरीय क्रीडा स्पर्धांचे यजमान पद हे धुळे उपविभागाकडे सोपविण्यात आले आहे.

नाशिक विभागस्तरीय महसुल क्रीडा स्पर्धा सन 2024-2025 जिल्हा क्रीडा संकुल, धुळे येथे 7 ते 9 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत आयेाजित केल्या आहे. या स्पर्धंत धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगांव, अहिल्यानगर येथुन क्रीडा स्पर्धक, शासकीय अधिकारी, महसुल कर्मचारी असे एकूण 600 खेळांडू सहभागी होणार आहे. या क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा संकुल, वाडीभोकर रोड, धुळे येथील संपुर्ण मैदान, इनडोअर हॉल 5 ते 9 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत खेळाडू, नागरिक तसेच पोलीस भरती सराव करणाऱ्यांसाठी बंद राहील, याची सर्व नागरिक व खेळाडूंनी नोंद घ्यावी. असेही जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. टिळे यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande