नाशिक , 3 जुलै (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर येथे मिनी आणि चाईल्ड कप तलवारबाजी राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंनी सुंदर खेळ करून सर्वसाधारण तिसऱ्या क्रमांकाचा चषक पटकावला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या २८ जिल्हा संघांनी सहभाग घेतला होता. नाशिकच्या २५ खेळाडूंनी सहभाग घेऊन चांगली कामगिरी करत रजत आणि कास्य पदकांची कमाई केली.
१२ वर्षे वयोगटात मुलांमध्ये शौर्य यादव याने फॉईल या प्रकारात कांस्यपदक मिळविले. याच गटात सॅबर प्रकारात विदित पवार आणि फॉईल प्रकारात चिरायु पटेल यांनी कांस्य पदके मिळविली. ह्रिदयांशु परदेशी आणि प्रणव डेर्ले यांनी कास्य पदके मिळविली. अंशुमन सोळंकी यानेही चांगला खेळ करत ई.पी. प्रकारात कांस्यपदक मिळविले.
मुलीच्या १२ वर्षे गटामध्ये अनन्या सुळे हीने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करून फॉईल या प्रकारात रजत पदकाला गवसणी घातली. तर याच गटात सॅबर प्रकारात शरण्या डेर्ले हीने कास्य पदक मिळविले. आराध्या कुंभार आणि मोक्षिता केसरकर यांनी फॉईल प्रकारात कांस्यपदक मिळविले. तर आराध्या ओंबळेनेही कास्य पदक मिळविले.
१० वर्षे गटात मुलांमध्ये शाहू पाटील याने याने फॉईल प्रकारात कास्य पदक मिळविले.
१० वर्षे गटात मुलींमध्ये अन्विता ताजने हीने रजत पदक तर शरण्या पारीख हीने कास्य पदक मिळविले. याच गटामध्ये फॉईल प्रकारात ग्रीष्मा पाटीलने आणि स्वानंदी खोकलेने सॅबर प्रकारात कांस्य पदके मिळविली. रेवा पाटील हीने ई.पी. प्रकारात कांस्यपदक मिळविले.
या सर्व खेळाडुंना क्रीडा प्रशिक्षक अजिंक्य दुधारे, जय शर्मा, राहूल फडोळ, प्रसाद परदेशी, आनंद चकोर यांचे मार्गदर्शन लाभले.
नाशिकच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करून पदक प्राप्त केल्याबद्दल नाशिकचे क्रीडाप्रेमी मान्यवर अजित दान, राहुल देशमुख, चंद्रशेखर सिंग, हेमंत पांडे, केशवअण्णा पाटील, अशोक दुधारे, आनंद खरे, राजू शिंदे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI