बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान भारताकडे रवाना 
वॉशिंगटन , 4 फेब्रुवारी (हिं.स.) : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांविरुद्ध तीव्र कारवाईला आता सुरुवात केली आहे. त्यानुसार, अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या स्थलांतरितांना घेऊन जाणारे अमेरिकेचे लष्करी विमान भारताकडे रवाना झाले आहे, अ
America


वॉशिंगटन , 4 फेब्रुवारी (हिं.स.) : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांविरुद्ध तीव्र कारवाईला आता सुरुवात केली आहे. त्यानुसार, अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या स्थलांतरितांना घेऊन जाणारे अमेरिकेचे लष्करी विमान भारताकडे रवाना झाले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सी-17 विमान स्थलांतरितांना घेऊन भारताकडे रवाना झाले आहे. परंतु ते किमान 24 तासांपर्यंत पोहोचणार नाही. यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटने (आयसीई) सुमारे 18 हजार कागदपत्रे नसलेल्या भारतीय नागरिकांची प्रारंभिक यादी तयार केली आहे. दरम्यान अमेरिकेहून भारताच्या दिशेने निघालेल्या विमानात कितीजण आहेत, हे स्पष्ट झालेलं नाही. डोनाल्ड ट्रम्प त्यांचा इमिग्रेशन अजेंडा राबवण्यासाठी लष्कराचा वापर करत आहेत, ज्यामध्ये अमेरिका-मेक्सिको सीमेवर अतिरिक्त सैन्य पाठवणे, स्थलांतरितांना देशाबाहेर नेण्यासाठी लष्करी विमानांचा वापर करणे आणि त्यांना राहण्यासाठी लष्करी तळ उघडणे यांचा समावेश आहे. पेंटागॉनने एल पासो, टेक्सास आणि सॅन दिएगो, कॅलिफोर्निया येथे अमेरिकन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या 5 हजारांहून अधिक स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी विमान सेवा सुरू केली आहे. आतापर्यंत, लष्करी विमानांनी ग्वाटेमाला, पेरू आणि होंडुरास येथे स्थलांतरितांना नेले आहे. अमेरिकेत बेकायदा स्थलांतरितांचा मुद्दा गाजत आहे. जानेवारी महिन्यात ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली त्यानंतर पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली.यावेळी अमेरिकेत बेकायदेशीरपणे आलेल्या भारतीय स्थलांतरितांना परत घेण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जे योग्य आहे ते करतील असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले होते.दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर हे वक्तव्य समोर आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande