बीएसएफने पिटळून लावले सशस्त्र घुसखोरांना
कोलकाता, 05 फेब्रुवारी (हिं.स.) : सशस्त्र घुसखोरांनी 4 आणि 5 फेब्रुवारीच्या मध्यरात्री भारत-बांगलादेश सीमेवर तैनात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर 2 वेळा हल्ले केल्याची घटना घडली. मोठ्या संख्येने काठ्या, कटर आणि शस्त्रे घेऊन आलेल्या बांगलादेशींनी बीएसएफ जवानांवर हल्ला चढवला. त्यानंतर जवानांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार करत त्यांना पिटाळून लावले. या धुमश्चक्रीत एका घुसखोराला बीएसएफ जवानांनी ताब्यात घेतले आहे.
मध्यरात्रीचा अंधार आणि धुके याचा फायदे घेऊन भारतात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या घुसखोरांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर अवघ्या 6 तासांत दोन वेळा हल्ला झाला. पहिला हल्ला रात्री 12 वाजताच्या सुमारास झाला. त्यानंतर पुन्हा हल्ला चढवण्यात आला. तथापि, बीएसएफने त्यांनाही बेदम मारहाण केली. हे बांगलादेशी घुसखोरी आणि तस्करीच्या उद्देशाने दक्षिण दिनाजपूरमधील मलिकपूर गावात घुसले होते. बांगलादेशींनी बीएसएफ जवानांवर हल्ला केला. त्यांच्याशी कडकपणे वागून बीएसएफने गोळीबार केला. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे बांगलादेशींनी बीएसएफ जवानांकडून शस्त्रे हिसकावण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक सैनिकही जखमी झाला आहे. सीमेजवळ दाट धुके होते. नंतर, बीएसएफ जवानांनी शोध घेतला तेव्हा एक बांगलादेशी जखमी अवस्थेत आढळला. जखमी बांगलादेशीला बीएसएफने तातडीने गंगारामपूर रुग्णालयात उपचारासाठी नेले. घटनास्थळावरून जळालेले तुकडे, काठ्या आणि वायर कटर जप्त करण्यात आले आहेत. जखमी बीएसएफ जवानांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. बांगलादेशींनी भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. बीएसएफ जवानांनी यापूर्वीही अनेक वेळा त्यांना सीमेवर रोखण्याचा प्रयत्न केला आहे.
-----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी