अवैध स्थलांतरितांची पहिली तुकडी भारतात परतली
चंदीगड, 05 फेब्रुवारी (हिं.स.) : अमेरिकेतील कथित अवैध भारतीय स्थलांतरित आज, बुधवारी मायदेशी परतले आहेत. अमेरिकेचे लष्करी विमान 104 भारतीयांना घेऊन पंजाबच्या अमृतसह येथे डेरेदाखल झाले. अमेरिकेने बेकायदेशीर स्थलां
भारतीय स्थलांतरितांना घेऊन परतलेले अमेरिकी सैन्य विमान


चंदीगड,

05 फेब्रुवारी (हिं.स.) : अमेरिकेतील कथित अवैध भारतीय स्थलांतरित आज,

बुधवारी मायदेशी परतले आहेत. अमेरिकेचे लष्करी विमान 104 भारतीयांना घेऊन

पंजाबच्या अमृतसह येथे डेरेदाखल झाले.

अमेरिकेने

बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

या

संदर्भात, बुधवारी 104 भारतीय

स्थलांतरितांना भारतात पाठवण्यात आले. हे सर्वजण बेकायदेशीर स्थलांतरित असल्याचे

सांगितले जाते. अमेरिकन लष्करी विमान आज अमृतसरला पोहोचले. टेक्सासमधील सॅन

अँटोनियो येथून आलेल्या या विमानात पंजाबमधील 30, हरियाणा

आणि गुजरातमधील प्रत्येकी 33, महाराष्ट्र आणि उत्तर

प्रदेशातील प्रत्येकी 3 आणि चंदीगडमधील दोघांचा समावेश होता. बेकायदेशीर

स्थलांतरितांविरुद्धच्या कारवाईचा भाग म्हणून भारतीयांची अशा प्रकारची ही पहिलीच

हद्दपारी आहेहद्दपार करण्यात

आलेल्यांमध्ये 25 महिला आणि 12 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यापैकी 48 लोक 25

वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. अमेरिका एकूण 205 भारतीय स्थलांतरितांना हद्दपार

करण्याची कारवाई करत आहे, त्यापैकी पहिले विमान 104 भारतीयांना घेऊन अमृतसरला पोहोचले. प्यू

रिसर्च सेंटरच्या आकडेवारीनुसार, भारतातील सुमारे 7 लाख 25 हजार बेकायदेशीर स्थलांतरित अमेरिकेत राहतात,

ज्यामुळे मेक्सिको आणि एल साल्वाडोर नंतर

अनधिकृत स्थलांतरितांची लोकसंख्या असलेला हा देश तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे.

अमेरिकेने

परत पाठवलेल्या या नागरिकांची प्राथमिक चौकशी केली. त्यांच्या कागदपत्रांची आणि

ओळखपत्रांची सखोल पडताळणी केल्यानंतर, तसेच वैद्यकीय तपासणी

केल्यानंतर, निर्वासितांना त्यांच्या

संबंधित राज्यांमध्ये आणि मूळ गावी पाठवण्यात आले, असे

सूत्रांनी सांगितले. संबंधित राज्य सरकारांनी निर्वासितांना घरी नेण्यासाठी विशेष

बसेसची व्यवस्था केली आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी बसेसमध्ये स्थानिक पोलिस

कर्मचारी देखील तैनात केले आहेत. सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्र आणि गुजरातमधून येणाऱ्या भारतीय

स्थलांतरितांना विमानाने त्यांच्या घरी पाठवले जाणार आहे.

-----------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande