नाशिक, 5 फेब्रुवारी, (हिं.स.)। प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या पाहणीचा आता मुहूर्त ठरला असून 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान नाशिक जिल्हा प्रशासन पाहणी करण्यासाठी या ठिकाणी जाणार आहेत मात्र त्यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा प्रशासनाने पाहणी केली
नासिक मध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन दर मंगळवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाते या बैठकीमध्ये कामकाजाचा आढावा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम घेत असतात.
नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी प्रयागराज येथे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाहणी करण्यात आली. याबाबतचा सविस्तर अहवाल तेथील प्रशासनाकडून मागवण्यात आला असून, त्याचा अभ्यास करुन दि.१३ ते दि.१५ फेब्रुवारी दरम्यान शिष्टमंडळ प्रयागराज येथे प्रत्यक्ष पाहणीसाठी जाणार असल्याचे विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने प्रयागराज येथे झालेल्या दुर्घटनांची माहिती घेऊन कोणकोणत्या भागातील सावधानतेच्या कोणकोणत्या उपाययोजनांची गरज आहे याबाबतची माहिती घेऊन कोणत्या क्षेत्रावर नाशिकला काळजी घेण्याची गरज आहे त्यादृष्टीने अभ्यास केला जाणार आहे. तसेच प्रयागराज येथे पर्वणीसाठी आलेल्या कोट्यवधी भाविकांच्या गर्दीचे नियोजन कसे केले जात आहे याची सविस्तर माहिती घेण्याच्या दृष्टीने दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी चाचपणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI