आरसीबीमुळे मुंबई इंडियन्सची थेट फायनल खेळण्याची संधी हुकली, दिल्ली संघाने गाठली फायनल
मुंबई, 12 मार्च (हिं.स.)।स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं महिला प्रीमियर लीगच्या अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभव केला.हा सामना जिंकून मुंबई इंडियन्सच्या संघाला थेट फायनल खेळण्याची संधी होती.मात्र, साखळी फेरीत
Mi vs rcb


मुंबई, 12 मार्च (हिं.स.)।स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं महिला प्रीमियर लीगच्या अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभव केला.हा सामना जिंकून मुंबई इंडियन्सच्या संघाला थेट फायनल खेळण्याची संधी होती.मात्र, साखळी फेरीतील या अखेरच्या सामन्यातील पराभवामुळे मुंबई इंडियन्स मागे पडली आणि ही संधी साधत ग्रुप टॉपर ठरलेली दिल्ली कॅपिटल्स संघानं थेट फायनल गाठली.

महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामात सहभागी पाच संघापैकी आरसीबी आणि यूपी वॉरियर्स हे दोन संघ आधीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात हे तीन संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरले. या तीन संघातील मुंबई इंडियन्स आणि दिल्ली यांच्यात ग्रुपमध्ये टॉप करून थेट फायनल खेळण्याची शर्यत होती. दोन्ही संघांनी साखळी फेरीतील ८ सामन्यातील ५ विजयासह प्रत्येकी १०-१० गुण आपल्या खात्यात जमा केले. पण उत्तम धावगतीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघानं थेट फायनल गाठली. आरसीबी विरुद्धचा सामना जिंकून मुंबई इंडियन्सला १२ गुणांसह ग्रुप टॉप करण्याची संधी होती. पण स्मृतीच्या संघानं हरमनप्रीतला ते ते साध्य करु दिले नाही.

आरसीबी विरुद्धच्या लढतीतील पराभवामुळे आता फायनल गाठण्यासाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला एलिमिनेटर लढतीत गुजरात जाएंट्स संघाला मात द्यावी लागेल. १३ मार्चला हे दोन संघ मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर एलिमिनेटरमध्ये एकमेकांना भिडतील. मुंबई इंडियन्स आणि गुजरात जाएंट्स यांच्यातील विजेता १५ मार्चला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध विजेतेपदासाठी मैदानात उतरेल. तिसऱ्या हंगामात नवा विजेता मिळणार की, मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचवणार ते पाहण्याजोगे असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande