रत्नागिरी, 11 मार्च, (हिं. स.) : चिपळूण येथील डी. बी. जे महाविद्यालयात प्रथम वर्ष शास्त्र विभागामध्ये शिक्षण घेत असलेली कुमारी तन्वी रेडीज हिची एशियन योगा स्पर्धेसाठी पटियाला येथे होणाऱ्या चाचणी शिबिरासाठी निवड झाली आहे.
कु. तन्वी रेडीज हिने आंतरमहाविद्यालय स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नुकत्याच उत्तराखंड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय ३८ व्या योगा स्पर्धेत तिने सुवर्ण कामगिरी नोंदविली. तिने आत्तापर्यंत दोन वेळेस खेलो इंडिया योगा स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी नोंदविली आहे. डी. बी. जे. महाविद्यालयाच्या २३-२४ च्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये तिला प्रतिष्ठचे समजले जाणारे डी. बी. जे. अभिमान बक्षीस व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.
एशियन योगा स्पर्धेसाठी नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व डी. बी. जे. महाविद्यालयाचे मार्गदर्शक मंगेश तांबे यांनी तिचे अभिनंदन केले व या स्पर्धेत तिने उत्तम आणि उज्ज्वल कामगिरी करून अनेक स्पर्धामधील अनुभवाचा पुरेपूर वापर करून मिळालेल्या सुवर्णसंधीचा उपयोग करून महाराष्ट्राचे व रत्नागिरी जिल्ह्याचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरावे, अशी आशा व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी