गुजरात : इमारतीला आग, तिघांचा होरपळून मृत्यू
राजकोट, 14 मार्च (हिं.स.) : गुजरातच्या राजकोट येथे अटलांटिस इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या इमारतीत अजूनही 30 लोक अडकले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.
राजकोट येथे इमारतीला भीषण आग

राजकोट, 14 मार्च (हिं.स.) : गुजरातच्या राजकोट येथे अटलांटिस इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या इमारतीत अजूनही 30 लोक अडकले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.

अटलांटिस इमारतीतून धुराचे लोट बाहेर पडू लागताच, आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या, त्यानंतर सुमारे 50 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. घटनेच्या व्हिडिओमध्ये रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उभ्या असल्याचे दिसून आले आहे, तर संकुलाजवळ गर्दी जमलेली दिसत आहे. आगीमुळे इमारतीच्या वरच्या मजल्यावरील फ्लॅट्सचे मोठे नुकसान झाले आहे. ही आगा नेमकी कशामुळे लागली याचा तपशिल मिळालेला नाही. परंतु, प्राथमिक तपासात ही आग विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जातेय.

--------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी

 rajesh pande