नागपूर, 14 मार्च (हिं.स.) : चंद्रपूरच्या एका महिला रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी दुर्लभ अशा बॉम्बे रक्तगटाच्या रक्ताची गरज होती. या गरीब महिलेला नागपुरातील डॉ. हेडगेवार रक्तपेढीने बॉम्बे रक्तगटाच्या चक्क 4 पिशव्या मिळवून दिल्या.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील हिरापुर येथील गावोगावी फिरून भाजीपाला विक्री करून उपजिवीका चालवायचे. या कुटुंबाचे सर्व सर्वसुरळीत होते. अचानक एक दिवस कुटुंबातील महिलेला पोटाचे दुखणे सुरू झाले. पुढील उपचारकरीता गडचिरोली येथे गेले. तिथे डॉक्टरांनी हिमोग्लोबीन कमी असल्याने रक्त देण्यास सांगितले. गडचिरोली रक्त पेढीने एक ओ पॉझिटिव रक्त दाता दिला. मात्र रक्ताचे क्रॉस मॅच काही जुळत नव्हते. शेवटी तपासणी पूर्ण झाल्यास समजले की सदर महिलेचा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे. शेवटी सर्वांशी बोलून नागपूर जीएमसी येथे उपचारकरीता आणण्यात आले. महिलेला गर्भपेशीत गाठी होत्या. त्यामुळे तिला मासिक पाळीमध्ये रक्त खूप जात होते. तिचे हिमोग्लोबीन अवघे 4 वर आले होते. तिला 4 ते 5 यूनिट रक्ताची गरज होती. बॉम्बे ब्लड ग्रुप रक्ताच्या 4 ते 5 पिशव्या मिळणे म्हणजे कठीण होते. व्हॉटस अपॅच्या माध्यमातून मुंबई ते सातारा संपर्क साधण्यात आला. त्यातून विक्रम यादव यांच्या माध्यमातून एक बॅग मिळाली. तर उर्वरित 4 यूनिटची व्यवस्था डॉ. हेडगेवार रक्त केंद्राच्या माध्यमातून झाली. योगायोग असा की शिबिरात ओ पॉझिटिव म्हणून रक्त दान करणाऱ्या रक्त दात्यांचे रक्त अत्याधुनिक मशीनमध्ये तपासणी केली असता ते बॉम्बे ग्रुपचे निघाले.
रक्त पेढीने रक्ताची व्यवस्था केल्या नंतर रंगपंचमीच्या दिवशी सर्जरी झाली. आता हिमोग्लोबीन वाढले आहे. पण 5 यूनिट रक्त मिळणे अशक्य वाटत असताना उपलब्ध झाले. संपूर्ण भारतात फक्त 180 रक्त दाते आहे. महिलेच्या गर्भ पेशीतील गाठी काढून पुढे अडचणी येवू नये म्हणून गर्भ पिशवी सुद्धा काढून घेतली. आता तिची तब्येत चांगली आहे. हेडगेवार रक्तपेढीने योग्य वेळी मदत करून सदर महिला आणि तिच्या कुटुंबात होळीच्या सणाला आनंदाचा रंग भरला आहे.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी