पंजाब सीमेवर पाकिस्तानी घुसखोराला अटक
चंदीगड, १४ मार्च (हिं.स.) : भारत-पाकिस्तान सीमेवर कारवाई करताना सीमा सुरक्षा दलाने एका पाकिस्तानी घुसखोराला अटक केली आहे. अमृतसर सेक्टरमधील सीमा चौकी मुल्लाकोट येथून बीएसएफने आरोपीला अटक केली आहे. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गस्ती प
file Photo


चंदीगड, १४ मार्च (हिं.स.) : भारत-पाकिस्तान सीमेवर कारवाई करताना सीमा सुरक्षा दलाने एका पाकिस्तानी घुसखोराला अटक केली आहे. अमृतसर सेक्टरमधील सीमा चौकी मुल्लाकोट येथून बीएसएफने आरोपीला अटक केली आहे.

बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गस्ती पथकाला एका व्यक्ती सीमा परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळला. त्याची चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. यावर सैनिकांनी तात्काळ कारवाई करत त्याला अटक केली आणि त्याची झडती घेतली. अटक केलेल्या पाकिस्तानीचे नाव मोहम्मद जैद असे आहे. जो पाकिस्तानातील हकीमा वाला गावचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. अटकेनंतर, बीएसएफचे अधिकारी मोहम्मद जैदची चौकशी करत आहेत. त्याने चुकून सीमा ओलांडली होता की कटाचा भाग म्हणून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता याचा छडा लावला जात आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande