बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर छापा
येवला, 14 मार्च (हिं.स.)। - मालेगाव तालुक्यात शेवाळेनगर येथे डोंगराळ गायरानात उभारलेल्या बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकून राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाने तो उद्ध्वस्त केला. तसेच ८ लाख ८६ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर छापा


येवला, 14 मार्च (हिं.स.)।

- मालेगाव तालुक्यात शेवाळेनगर येथे डोंगराळ गायरानात उभारलेल्या बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकून राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाने तो उद्ध्वस्त केला. तसेच ८ लाख ८६ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर एक जण फरारी झाला आहे.

सटाणा येथील राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाला मिळालेल्या बातमीनुसार,हा छापा घालण्यात आला. डोंगराळ भागाच्या गायरानात उभारलेल्या अस्थाई कुडाच्या शेडमध्ये अचानक छापा टाकला असता तेथे अवैध दारू निर्मितीचे साहित्य, देशी ब्लेंडने भरले.

प्लास्टिक ड्रम, ५०० लि. क्षमतेचे दोन प्लॅस्टिक ड्रम, त्यात प्रत्येकी अंदाजे २५० लि. देशी ब्लेंडने भरलेले, रॉकेट संत्रा दारू ९० मि. लि. क्षमतेचे एकूण ७७ बॉक्स, एक बॉटलींग मशीन, देशी दारु रॉकेट संत्राचे एकूण दोन रोल, देशी दारू रॉकेट संत्राचे एकूण दोन हजार जिवंत बुचे, १ एचपीच्या एक इलेक्ट्रीक पाणी मोटार, ५०० लि. क्षमतेच्या दोन रिकामे ड्रम व २५० लि. क्षमतेचे दोन रिकामे ड्रम, प्लास्टिक ट्रे, रॉकेट नावाचे १०० रिकामे कागदी खोके, ६० फुट रबरी नळी, एक मोबाईल, एमएच ४१ बीएस ०३७० असे एकूण ८ लाख ८६ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी विष्णू शिवाजी वाघमोडे (रा. विखरणी, ता. येवला), शुभम् मुरलीधर आवाळे (रा. विखरणी, ता. येवला), सचिन आण्णासाहेब भुसनर (रा. मोहेगाव, ता. नांदगाव) यांना अटक करण्यात आली असून, पद्म विश्वकर्मा हा आरोपी फरारी झाला आहे. या चौघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या विविध कलमांन्वये, तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही कारवाई निरीक्षक गोपाल आर. चांदेकर, प्रकाश घायवट, दुय्यम निरीक्षक मनीष पाटील, अमोद भडांगे, प्रवीण मंडलिक, अवधूत पाटील, विठ्ठल हाके, संतोष मुंढे, गणेश शेवगे, राजेंद्र चव्हाणके, अनिल जाधव व वाहनचालक दीपक नेमणार यांनी केली. या कामगिरीबद्दल विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक अमृत तांबारे यांनी या पथकाचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande