नाशिक, 14 मार्च (हिं.स.)।येथील वडाळा रोड वरती गोमास खरेदी करणारे आणि विक्री करणारे या दोन्हीही आरोपींना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून गोमासासह आलिशान गाडी देखील जप्त करण्यात आली असून याबाबतचा गुन्हा हा मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेमधील पथकाला मिळालेल्या माहितीनुसार वडाळा रोड वरील खोडेनगर येथे सापळा लावुन होंडा सिटी गाडी कमांक एम.एच ०२-बी. वाय-६८४८ या मधील संशयित आरोपी, शाहरूख निसार पिंजारी, वय-२९ वर्षे, रा-वार्ड नं २ दालीवाली चाळ, काझीबाबारोड श्रीरामपुर जि. अहिल्यानगर , समीर खलील शेख, वय-२५वर्षे, रा-ममदापुर कादरी सरकार दर्यासमोर ता. राहता जि. अहिल्यानगर, , अयान जब्बार शेख वय-१२वर्षे, रा- अजेमरी मस्जीद, कयहा जुने नाशिक, आसिफ हुसेन कुरेशी, वय-३६वर्षे, रा-अजमेरी मस्जीद कथडा भद्रकाली नाशिक, हुजेफ उमरसाहब कुरेशी, वय-२६वर्षे, रा-कादरी मस्जीदमानणे, बागवानपुरा भद्रकाली नाशिक, अरमान इस्माईल शेख, वय-३०वर्षे, स-वहारे कॉम्प्लेक्स चौकमंडई भद्रकाली नाशिक अशांच्या ताब्यातून गौवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा कत्तल केलेले मास अंदाज ५०० किलो वजनाचे गोमांस व वाहतुक करण्यासाठी वापरलेली होंडा सिटी कार असा एकुण ३लाख ५० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेवुन या सर्व आरोपीं विरोधात प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५, ५ क. ९.९ अ. २ व तसेच प्राण्यास कुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ एल, सह भा. न्या. सं. कलम कलम ३२५, ३(५) तसेच मो.वा.का कलम ६६(१)/१९२ प्रमाणे मुंबईनाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI