अहमदाबाद, 30 मार्च (हिं.स.)।आयपीएलमध्ये शनिवारी(दि. ३०) झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबईचा ३६ रन्सने पराभव केला. आयपीएल २०२४ मध्ये तीन वेळा मुंबई इंडियन्सने स्लो ओव्हर रेटने गोलंदाजी केल्यामुळे आयपीएल 2025 च्या मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती.मात्र या चुकीची पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे.यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यावर कारवाई करण्यात आली आहे.
गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या टीमला पुन्हा स्लो ओव्हर्सचा फटका बसला आहे.बीसीसीआयने हार्दिक पांड्याला लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. शनिवारी 29 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध मुंबई इंडियन्सने 20 व्या ओव्हरची सुरुवात वेळेवर झाली नाही. त्यासाठी मुंबई इंडियन्सला शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना केवळ चार खेळाडूंना ३० यार्डच्या बाहेर ठेवता आल्याची शिक्षा देखील झाली. यानंतर आयपीएल आयोजकांनी कर्णधार हार्दिक पांड्यावर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आयपीएलने जारी केलेल्या मिडिया रिलीजमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध इंडियन या सामन्यामध्ये स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला आहे. कारण हा त्याच्या टीमचा सीझनमधला पहिला गुन्हा असल्याने अनुच्छेद 2.2 च्या अंतर्गत करार झाला होता. ओव्हर रेट गुन्ह्यांसाठी पांड्याला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
दरम्यान यंदाच्या आयपीएलमध्ये तीन वेळा स्लो ओव्हर झाल्यासही कोणत्याही खेळाडूवर बंदी घालण्यात येणार नाही. यावेळी बीसीसीआयने डिमेरिट पॉईंट सिस्टीम लागू केली आहे. त्यामुळे आता स्लो ओव्हर रेटमुळे कोणत्याही कर्णधारावर बंदी घालण्यात येणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode