कर्णधार समकीत सुराणाचे नाबाद शतक व सामन्यात ७ बळी
नाशिकचे यूनायटेड विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण राज्यस्तरीय आमंत्रितांच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा नाशिक, 1 एप्रिल (हिं.स.) : नाशिकयेथेहोत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या,राज्यस्तरीय १९वर्षांखालीलवयोगटातील आमंत्रितांच्या क्र
राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा १९ वर्षांखालील  नाशिकचे यूनायटेड विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण  कर्णधार समकीत सुराणाचे नाबाद शतक व  सामन्यात ७ बळी


नाशिकचे यूनायटेड विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण राज्यस्तरीय आमंत्रितांच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा नाशिक, 1 एप्रिल (हिं.स.) : नाशिकयेथेहोत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या,राज्यस्तरीय १९वर्षांखालीलवयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या (एम सी एइन्विटेशन लीग ),दोन दिवसीय कसोटीच्याहुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर झालेल्याअनिर्णित सामन्यात नाशिकने यूनायटेड विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले.कर्णधार समकीत सुराणाने अष्टपैलू कामगिरी करत नाबाद शतक झळकवले व सामन्यात ७ बळी घेत जोरदार अष्टपैलू कामगिरी केली. नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करताना यूनायटेडने सर्वबाद २२७ धावा केल्या. किनशुक भारतीने नाबाद १०० धावा केल्या. नाशिकच्या कर्णधारसमकीत सुराणाने४ तर कृष्णा केदारने ३ बळी घेतले.उत्तरादाखल ३ बाद ६ व ६ बाद ७६ अशा खराब अवस्थेतून पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना, डावखुऱ्या समकीत सुराणाने कर्णधाराची खेळी करत १८ चौकार व १ षट्कारासह नाबाद दमदार १११ धावा केल्या व त्या जोरावर नाशिकने ९ बाद २६७ धावा करून यूनायटेडवर पहिल्या डावात आघाडी घेतली. समकीतला व्यंकटेश बेहरे ३९ वज्ञानदीपगवळी ३६ यांची साथ मिळाली. यूनायटेडच्या यश बोरकरने ५ बळी घेतले. सामना संपेपर्यंत दुसऱ्या डावात यूनायटेडने ५ बाद १०३ धावा केल्या. समकीत सुराणाने ३ बळी घेतले. इतर दोन सामन्यात एम सी सी , म्हसरूळ मैदानावर डि व्ही सी ए विरुद्ध नंदुरबार सामन्यात, डि व्ही सी एने देव वेद १३२ व ओम पाटील ११० यांची शतके व वरद छट्टरच्या ७ बळींच्या जोरावर नंदुरबारवर १ डाव व १५५ धावांनी मोठा विजय मिळवला. तर संदीप फाऊंडेशनच्या मैदानावर सातारा विरुद्ध उस्मानाबाद सामन्यात साताराने उस्मानाबादवर ८ गडी राखून विजय मिळवला.साताराच्या संग्राम सिंह नारळेने ६९ धावा व श्रावण खाडेने डावात ५ बळी तर उस्मानाबादच्या गौरव लंगोरेने डावात ८ बळी घेतले व अनुदीप देवलकरने ५६ धावा केल्या. ---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande