मुंबई, 1 एप्रिल (हिं.स.)। मुंबई आणि कोलकाता यांच्यातील सोमवारी(दि. ३१) झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने केकेआरवर ८ विकेट्सने विजय मिळवून आपले खाते खोललं आहे. यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सने ३ सामन्यात १ विजय मिळवला असून २ सामने गमावले आहेत.
या सामन्यात मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबईच्या संघाकडून अश्वनी कुमार या खेळाडूने पदार्पण करत पहिल्याच सामन्यात पदार्पण करत ४ विकेट घेतल्या आणि कोलकाताचा संघ बॅक फूटवर ढकलला गेला. अश्वनी कुमारला बाकी गोलंदाजांनीदेखील उत्तम साथ दिली. मुंबईकडून दीपक चाहरने २, हार्दिक, सँटनेर, बोल्ट आणि विघ्नेशने प्रत्येकी १ विकेट घेतली. कोलकाताच्या संघाला मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर फक्त ११६ धावा करता आल्या.
कोलकाताकडून अंगकृष रघुवंशी याने सर्वाधिक २६ धावा केल्या. तर बाकी खेळाडूंना काही विशेष कामगिरी करता आली नाही. यानंतर प्रत्युत्तरादाखल उतरलेल्या मुंबईच्या संघाकडून रायन रिकेलटन याने सर्वाधिक ६२ धावा केल्या तर रोहित १३, विल जॅक्स १६, सूर्यकुमार यादवने २७ धावा केल्या. तर कोलकाताकडून आंद्रे रसेलने २ विकेट घेतल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode