मुंबई, 1 एप्रिल (हिं.स.)।इंडियाज गॉट लेटेंट' शोच्या वादानंतर प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादियाने पुन्हा एकदा नव्याने कमबॅक केलं आहे.समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या कार्यक्रमात अश्लील आणि वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर वादात अडकला होता. त्यामुळे काही दिवस तो सोशल मीडियापासून दूर होता. तसेच त्यानं कुठलंही पॉडकास्ट प्रदर्शित केलं नव्हतं. आता रणवीरनं पुन्हा एकदा आपलं पॉडकास्ट सुरू केलं आहे.
रणवीरनं 'इंडियाज गॉट लेटंट' शोमधल्या वाद-विवादानंतर आपलं पहिलं पॉडकास्ट युट्यूब चॅनल टीआरएस चॅनलवर शेअर केलं आहे. यामध्ये रणवीर अलाहाबादिया बौद्ध भिक्षू पालगा रिनपोछे यांच्याशी चर्चा केली आहे. पॉडकास्टमध्ये पालगा रिनपोछे यांनी म्हटलं, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून करत असलेल्या कामाबद्दल मी आभारी आहे, या व्यासपीठाच्या माध्यमातून लाखो लोकांना फायदा झाला आहे. अनेक जाणकार लोकांनी इंटरनेट, यूट्यूब, अॅप्स आणि स्पॉटीफायद्वारे त्यांचं कौशल्य इतरांसोबत शेअर केलं आहे. तुम्ही हे महान कार्य करत राहावं, अशी मी नेहमीच प्रार्थना करेन, केवळ लोकांना शिक्षितच नाही तर प्रेरणाही देत राहा. तसेच, ज्ञानाचा प्रसार करत रहा. आजकाल लोकांकडे भरपूर ज्ञान आहे, पण त्यांना प्रेरणेचा अभाव आहे. तुमचं माध्यम या बाबतीत खूप उपयुक्त ठरलं आहे. मी तुम्हाला हे चांगलं काम सुरू ठेवण्याची विनंती करतो.
रणवीर म्हणाला, आपण आयुष्यात आधी दोनदा भेटलो आहोत आणि जेव्हा मी अडचणीत होतो, तेव्हा तुम्ही नेहमीच माझ्या मदतीला आला आहात. मी एका मोठ्या आव्हानाला तोंड देतोय, ज्याचा विचारही मी कधीही केला नव्हता. म्हणून मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, तुम्हाला भेटून आनंद झाला. दरम्यान, अलीकडेच रणवीरनं व्हिडीओ शेअर करत सर्वांची माफी मागितली होती आणि एक संधीची विनंती केली होती. तसेच या काळात त्याच्या पाठिशी उभे राहिलेल्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे त्याने आभार मानले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode