रणवीर अलाहाबादियाच्या परदेश प्रवासवरील बंदी कायम
नवी दिल्ली, 01 एप्रिल (हिं.स.) : इंडियाज गॉट टॅलेंट या वादग्रस्त कार्यक्रमामुळे चर्चेत आलेला युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या परदेश प्रवासावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने तुर्तास त्याच्या परदेश प्रवासावरील निर्बंध हटवण्यास नकार द
SC logo


नवी दिल्ली, 01 एप्रिल (हिं.स.) : इंडियाज गॉट टॅलेंट या वादग्रस्त कार्यक्रमामुळे चर्चेत आलेला युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या परदेश प्रवासावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने तुर्तास त्याच्या परदेश प्रवासावरील निर्बंध हटवण्यास नकार दिलाय.

यूट्यूब पॉडकास्टमध्ये शालीनता राखली जाईल, अशी हमी रणवीर अलाहाबादियाने सर्वोच्च न्यायालयात आज, मंगळवारी दिली. इंडियाज गॉट लॅटेंट वाद प्रकरणी युट्यूबर अलाहबादियाने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या वादानंतर सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबादियावर परदेश प्रवास करण्यास निर्बंध घातले आहेत. ते निर्बंध उठवण्याची मागणी अलाहाबादियाच्या वकिलांनी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. के. सिंह यांच्या खंडपीठाकडे केली. मात्र, न्यायालयाने परदेश प्रवासावरील निर्बंध हटवण्यास नकार दिला. भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी माहिती दिली की, अलाहबादिया यांच्याविरुद्धची चौकशी पूर्ण होण्यासाठी आणखी दोन आठवडे लागतील. यावर न्यायालयाने म्हटले की, परदेश प्रवास करण्याची परवानगी देण्यासाठी अलाहबादिया यांच्या याचिकेवर ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर विचार केला जाऊ शकतो.

--------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande