रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी ईडी कार्यालयात
हरियाणाच्या गुरुग्राम येथील जमिनीचे प्रकरण नवी दिल्ली, 15 एप्रिल (हिं.स.) : हरियाणाच्या गुरुग्राम येथील जमीन व्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेस खासदार प्रियंका वाड्रांचे पती रॉबर्ट यांना 8 एप्रिल रोजी समन्स बजावले होते. त्यानुसार आज, म
रॉबर्ट वाड्रा


हरियाणाच्या गुरुग्राम येथील जमिनीचे प्रकरण

नवी दिल्ली, 15 एप्रिल (हिं.स.) : हरियाणाच्या गुरुग्राम येथील जमीन व्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेस खासदार प्रियंका वाड्रांचे पती रॉबर्ट यांना 8 एप्रिल रोजी समन्स बजावले होते. त्यानुसार आज, मंगळवारी (15 एप्रिल रोजी) वाड्रा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झालेत.

ईडीच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार हे प्रकरण गुरुग्रामच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी आणि डीएलएफ यांच्यातील 3.5 एकर जमिनीच्या हस्तांतरणाशी संबंधित आहे. फसवणूक आणि नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप आहेत. ऑक्टोबर 2011 मध्ये, अरविंद केजरीवाल यांनी रॉबर्ट वड्रा यांच्यावर राजकीय लाभाच्या बदल्यात डीएलएफ लिमिटेडकडून 65 कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज आणि मोठ्या प्रमाणात जमीन घेतल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी रॉबर्ट म्हणाले की, आपण जनतेसाठी आवाज उठवत असून ईडी चौकशी म्हणजे आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. मी नेहमीच सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि देत राहीन. आम्ही ईडीला सांगितले की आम्ही आमचे कागदपत्रे गोळा करत आहोत, मी येथे येण्यास नेहमीच तयार आहे, मला आशा आहे की आज काही निष्कर्षापर्यंत पोहोचाल. या प्रकरणात काहीही नाही. जेव्हा मी देशाच्या बाजूने बोलतो तेव्हा मला थांबवले जाते, राहुल गांधींना संसदेत बोलण्यापासून रोखले जाते.

हे सर्व भाजपकडून होत असून हा राजकीय सूड आहे. लोक माझ्यावर प्रेम करतात आणि मी राजकारणात यावे अशी त्यांची इच्छा आहे. जेव्हा मी राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त करतो तेव्हा ते मला खाली खेचण्यासाठी आणि खऱ्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी जुने मुद्दे उपस्थित करतात. गेल्या 20 वर्षांत मला 15 वेळा बोलावण्यात आले आणि प्रत्येक वेळी माझी 10 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली. तब्बल 23 हजार कागदपत्रे गोळा करणे सोपे नसल्याचे वाड्रा यांनी सांगितले.----------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande