चीनच्या इशाऱ्यानंतर ट्रम्प यांचा टॅरिफमध्ये बदल
वॉशिंगटन , 15 एप्रिल (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील आयात शुल्कात कपात केली आहे.ट्रम्प यांचा हा निर्णय 'यू-टर्न' म्हणून पाहिला जात आहे. टॅरिफ युद्ध सुरू केल्यास संपूर्ण जग
America vs china


वॉशिंगटन , 15 एप्रिल (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील आयात शुल्कात कपात केली आहे.ट्रम्प यांचा हा निर्णय 'यू-टर्न' म्हणून पाहिला जात आहे.

टॅरिफ युद्ध सुरू केल्यास संपूर्ण जगाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, आणि अमेरिका स्वतःही अडचणीत येईल, हे यामधून स्पष्ट होते. सध्या ट्रम्प यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक्सवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय जिनपिंग यांच्या इशाऱ्याचा परिणाम मानला जात आहे, मात्र, खरे कारण म्हणजे चीनने दुर्मीळ खनिजांची निर्यात थांबवली असून त्यामुळे अमेरिकेला ही आयात सक्तीने करावी लागत आहे.खरे तर अमेरिका चीनवर असलेल्या दुर्मीळ खनिजांच्या आयातीवर अवलंबून आहे. या दरम्यान चीनने अमेरिकन पोल्ट्री उत्पादनांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. पनामा येथे चीनच्या वर्चस्वाला कमी करण्याचे प्रयत्न अमेरिकेने सुरू केले आहेत, तर चीनने समुद्रमार्ग मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. हे टॅरिफ युद्ध आता जागतिक अर्थव्यवस्थेवरही खोल परिणाम करत आहे.

दुर्मीळ खनिज अर्धसंवाहक निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. या खनिजांचा पुरवठा बंद झाल्यामुळे अनेक उत्पादन कंपन्यांचे काम ठप्प झाले आहे. याचा मोठा फटका अमेरिकेतील वाहन व अंतराळ उद्योगांना बसत आहे.त्यामुळे ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या संगणक, लॅपटॉप, डिस्क ड्राइव्ह, डेटा प्रोसेसिंग उपकरणे, अर्धसंवाहक, मेमरी चिप्स, फ्लॅट पॅनल डिस्प्ले यांसारख्या वस्तूंवर नवीन शुल्क लावलेले नाही. यामागील कारण म्हणजे ही उत्पादने चीनमधून आणणे भाग आहे, हे जिनपिंग यांनी ओळखले असून त्यांनी ट्रम्पच्या निर्णयाला 'आशेचा किरण' म्हटले आहे.

चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अमेरिका आपली परस्पर करनीती पूर्णपणे मागे घ्यावी. त्यांनी म्हटले की, अमेरिकेने स्वतःच्या चुका सुधाराव्यात. हे स्पष्ट आहे की ट्रम्प यांच्या टॅरिफ युद्धात यू-टर्न सुरू झाला आहे आणि जर तसे झाले नाही, तर चीनने दुसरा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande