रत्नागिरी, 18 एप्रिल, (हिं. स.) : संस्कृत भारतीच्या येथील शाखेतर्फे येत्या २१ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत वासंतिक वर्गाचे आयोजन केले जाणार आहे. या वासंतिक वर्गात वय वर्षे ६ पुढील सर्व जण सहभागी होऊ शकतात.
या पाच दिवसांमध्ये दररोज संध्याकाळी पाच ते साडेसहा असा दीड तास हा वर्ग रत्नागिरी शहरात ६ ठिकाणी होणार आहे. या वासंतिक वर्गामध्ये संस्कृत श्लोक, संस्कृत स्तोत्र, संस्कृत सुभाषिते शिकविली जाणार आहेत. या वर्गांचे स्थान, वेळ आणि तेथील शिक्षक यांची माहिती देण्यात आली असून सोयीच्या असलेल्या ठिकाणी या वर्गामध्ये अवश्य सहभागी व्हावे, असे आवाहन संस्कृत भारतीतर्फे करण्यात आले आहे.
ही ठिकाणे अशी - गजानन महाराज मंदिर पाॅवर, हाऊस, स्नेहाताई जोशी (9420798013), साई मंदिर, गोडाऊन स्टॉप - राजश्रीताई लोटणकर (9096443455), विठ्ठल मंदिर, कुवारबाव वैशालीताई दळी (9422738647), गोखले सभागृह, साळवी स्टॉप, अस्मिता फाटक (8806524712), राणी लक्ष्मीबाई सभागृह, मनस्वी नाटेकर (9766902991), पतितपावन मंदिर, सिद्धी कोळेकर (9136203469).
ज्या वर्गात जायचे असेल, तेथील शिक्षिकांना फोन करून आपले नाव आणि क्रमांक कळवावा किंवा सोबत दिलेल्या गूगल फॉर्ममध्ये नावनोंदणी करावी, असे सूचित करण्यात आले आहे. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfz9VNCbc0i0CADtKAZ5FmlnPIOjaTd4QUFBwIw39neTrQtSQ/viewform?usp=header
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी