डोंबिवली, १९ एप्रिल (हिं.स.) - गेली अनेक वर्षे आपण हिंदु-मुस्लिम भाई-भाई म्हणण्याची घाई करतो, परंतु प्रत्यक्षात हिंदु-मुस्लिम हे कधीच भाई-भाई होऊ शकत नाही. मुळात मुस्लिम पंथीय लोक विविध माध्यमातून भारत इस्लामिक राष्ट्र होण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी लव्ह जिहाद, हलाल जिहाद बरोबरच लोकसंख्या वाढ, भूमी जिहाद आदी सर्वच प्रकार अवलंबत आहेत. केंद्र सरकारला या गोष्टी माहिती असल्यामुळेच सरकार देखील ते रोखण्यासाठी विविध रणनीतींचा वापर करत आहे. जेणेकरून मुस्लिमांंचीही चोहोबाजूंनी नाकेबंदी करणे शक्य होईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर यांनी केले.
डोंबिवली येथील सुप्रसिद्ध पै फेन्डस् लायब्ररीचे पुंडलिक पै यांच्या वतीने वक्फ बोर्ड कायदा समजून घेताना... या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात ते बोलत होते. या परिसंवादात प्रसिद्ध जागतिक व्याख्याते, प्रवचनकार, लेखक, इतिहास अभ्यासक डाॅ. सच्चिदानंद शेवडे आणि हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर सहभागी झाले होते.
परुळकर पुढे म्हणाले की, मुस्लिमांच्या गजवा ए हिंद विरोधात सरकारने उम्मीद सुरू केले. त्याशिवाय नोटबंदी, जीएसटी, कलम ३७०, ३५ अ, तिहेरी तलाक, राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) यांसारखे निर्णय घेऊन एकप्रकारे मुस्लिमांचे मनसुबे आणि त्यांना मिळणारी रसद तोडत आहेत. दुसरीकडे या गोष्टी सरकार निष्कारण लादत असल्याचे मत काही जणांकडून व्यक्त होते, मात्र या मागे सरकारची रणनीती काय आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. विभाजनावेळी मुस्लिमांनी म्हटले होते, हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्थान, तीच स्थिती आता चालू आहे. मात्र आपण इतिहासातून काहीच शिकलो नाही हेच खरे. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे कधी परिस्थिती पाहून पळून गेले नाहीत, उलट त्यावर मात करण्यासाठी रणनीती आखली आणि त्यानुसार शत्रूवर आक्रमण करून त्यांचा नायनाट केला. मात्र आम्ही केवळ रडत राहतो, पण लढत नाही. जर आपण सर्वजण लढायला शिकलो नाही, तर आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आपलं अढळ स्थान निर्माण होण्यासाठी तपस्या करणाऱ्या ध्रुवाचे वारसदार नाहीत. आपण सर्वांनी सरकार करत असलेल्या राष्ट्र आणि धर्म विषयक उपक्रमांच्या पाठीशी कायम उभे राहिले पाहिजे ते आपले दायित्व आहे. येणाऱ्या पिढीला घटना, कायदा यांचे ज्ञान होण्यासाठी कार्यशाळा घेऊन त्यांना निर्भय बनवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीतील सकारात्मक गोष्टी समोर आल्याच नाहीत ! - डाॅ. सच्चिदानंद शेवडे
प्रसिद्ध जागतिक व्याख्याते, प्रवचनकार, लेखक, इतिहास अभ्यासक डाॅ. सच्चिदानंद शेवडे म्हणाले की, वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यात कुठल्याही प्रकारची स्थगिती देण्यात आलेली नाही. जो तो आपल्या आपल्या परीने अर्थ काढून सोयीस्कररित्या मांडण्याचा प्रयत्न करतो. त्याच गोष्टी आपल्यासमोर येतात. त्यामुळे आपणही त्यात खऱ्या मानून चालतो. मात्र त्या सुनावणीत काही सकारात्मक गोष्टीही झाल्या, त्या आपल्यापर्यंत आल्याच नाहीत किंवा येऊ दिल्या जात नाहीत. दहा वेळा एकच गोष्ट खोटी, बुद्धिभेद करून सांगितली की ती खरी वाटायला लागते. जसे विभाजनानंतर येथील मुस्लिम पाकिस्तानात गेले, तेथील हिंदू भारतात आले. त्या हिंदूंनी मुस्लिमांच्या जागा घेण्यापूर्वी तत्कालीन सरकारने बोर्ड बनवून नियम केले. पण तिकडे पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांसाठी तेथील सरकारने कायदे, बोर्ड केले नाही. विभाजनानंतरही काही मुस्लिम पाकिस्तानाच न जाता भारतातच आताच्या उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या भागात राहिले. त्या मुस्लिमांना काॅंग्रेसवाल्यांनी जाणीवपूर्वक जवळ केले. त्याचे परिणाम आपण गेली अनेक वर्षे पाहत आहोत. आज मुर्शिदाबादहून हिंदूंना पळावे लागले. उद्या आणखी कुठून पळावे लागेल. पळून पळून भूमी संपेल तेव्हा कुठे जाणार, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. वक्फ म्हणजे धर्मादायमध्ये हस्तक्षेप नाही. आधीच्या वक्फ कायद्यात पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या मालमत्तांचाही समावेश करण्यात आला होता. त्याचाच फायदा त्यांना होतो. गड-किल्ल्यांवर देखील होणारी प्रार्थनास्थळे त्याचाच एक भाग आहे. हा कावा आम्हाला कधी कळणार आहे की नाही.
वक्फ सुधारणा कायद्याविरोधात दंगली घडवणे म्हणजे एकप्रकारे लिटमस टेस्ट - सतीश कोचरेकर
हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर म्हणाले की, वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर चुकीची माहिती पसरवली जात आहे. ज्यातून ठिकठिकाणी दंगली पसरवल्या जात आहेत. या दंगली म्हणजे एकप्रकारे लिटमस टेस्ट आहे. या माध्यमातून एका ठिकाणी दंगल घडवल्यावर त्यांचे परिणाम काय होतात याची चाचणी केली जाते. यातूनच अतिरेकी, धर्मांध आपली रणनिती ठरवतात. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादचे उदाहरण ताजे आहे. येथील हिंदू महिला हतबल होऊन धर्मांधांना आपल्यावर बलात्कार करा, पण माझ्या पती, मुलांना सोडा, अशी विनवणी करताना दिसली होती. अशा घटना दिवसेंदिवस देशातील विविध भागांत वाढत आहेत. याला विरोध करण्यासाठी व्यापक प्रमाणावर हिंदू संघटन आवश्यक आहे. वक्फ बोर्ड कायद्याची आवश्यकता का आहे, हेही यातून स्पष्ट होते. म्हणूनच आज झालेला कार्यक्रम अन्यत्र अधिकाधिक प्रमाणावर झाले पाहिजेत. सध्या या विधेयकासंदर्भातील उदासीनता आश्चर्यकारक आहे. जशी चाय पे चर्चा होते, तशी विविध कार्यालये, कुटुंबांत चर्चा व्हायला हवी. एकूणच वक्फची सुरुवात, त्याचा इतिहास यांचा अभ्यास करून वर्तमानातील स्थिती सुधारण्याबरोबरच भविष्यातील परिणाम समजून घेतले पाहिजेत. हा इतर कायद्यांप्रमाणे सामान्य कायदा म्हणत दुर्लक्ष करू नका. उपरोक्त कायद्याविषयी सामाजिक वातावरण बिघडवण्याचा धर्मांधांचा कुटिल डाव जाऊन घ्या आणि त्यांच्या कैकपटीने अधिक सरकारने केलेल्या या कायद्याला समर्थन देणे आज काळाची गरज बनली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी