मालेगावात मुस्लिमांकडून काळ्याफिती लावुन केंद्र सरकारचा निषेध
मालेगाव, 18 एप्रिल (हिं.स.) वक्फ बोर्ड दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आज शुक्रवारी नाशिकच्या मालेगाव येथे मुस्लिम धर्मियांकडून नमाज पडताना काळ्याफिती लावून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारने गेल्या 11 एप्रिल 2025 रोजी संवैधानिक
जुम्मा चा नमाज पडत असताना काळ्याफिती बनवून केंद्र सरकारचा निषेध


मालेगाव, 18 एप्रिल (हिं.स.) वक्फ बोर्ड दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आज शुक्रवारी नाशिकच्या मालेगाव येथे मुस्लिम धर्मियांकडून नमाज पडताना काळ्याफिती लावून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

केंद्र सरकारने गेल्या 11 एप्रिल 2025 रोजी संवैधानिक पद्धतीने वफ बोर्ड कायदा मंजूर केेला आहे. वक्फ दुरूस्ती कायद्याला अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तर

सुप्रीम कोर्टाने वक्फ कायद्यातील दोन दुरुस्तींच्या अंमलबजावणीस प्रतिबंध लावला आहे. यापार्श्वभूमीवर आज शुक्रवारी मालेगाव शहरातील हजारो मुस्लिमांनी वक्फ दुरूस्ती कायद्याचा निषेध करण्यासाठी आपल्या उजव्या हाताच्या दंडावरती काळी फित बांधून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. नाशिक शहरामध्ये देखील काही मशिदींमध्ये असाच निषेध व्यक्त करण्यात आला. तर शेजारी असलेल्या धुळे जिल्ह्यामध्ये देखील दुपारी तीन वाजता जुम्माचा नमाज पठण करत असताना असाच काळ्याफिती बनवून निषेध व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande