डॉ. सुश्रृत घैसास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे, 20 एप्रिल (हिं.स.)। गर्भवती महिलेवर वेळेत उपचार न केल्याचा आणि वैद्यकीय उपचारात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरुन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डाॅ. सुश्रृत घैसास यांच्याविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला. ससून रुग्णालयाच्या
डॉ. सुश्रृत घैसास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल


पुणे, 20 एप्रिल (हिं.स.)।

गर्भवती महिलेवर वेळेत उपचार न केल्याचा आणि वैद्यकीय उपचारात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरुन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डाॅ. सुश्रृत घैसास यांच्याविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला. ससून रुग्णालयाच्या समितीने या प्रकरणाबाबत पोलिसांकडे अहवाल सादर केल्यानंतर पोलिसांनी डाॅ. घैसास यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची कारवाई केली.याप्रकरणी प्रियांका अक्षय पाटे (26, रा. विश्रांतवाडी) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून डाॅ. सुश्रृत घैसास यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (वैद्यकीय उपचारात निष्काळजीपणा किंवा हलगर्जी) अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वहिनी ईश्वरी भिसे (37) या गर्भवती असल्याने त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे डॉ. घैसास यांच्याकडे उपचार सुरू होते. त्यांना त्रास होऊ लागल्याने 28 मार्च रोजी त्यांना दीनानाथ रुग्णालयात हलविण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande