रांची, 21 एप्रिल (हिं.स.) : झारखंडमध्ये सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. राज्याच्या बोकारो जिल्ह्यातील लालपानिया परिसरात सुरक्षादलांनी आज, सोमवारी सकाळी 8 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार केंद्रीय राखीव पोलीस दलाने राज्य पोलिसांसोबतच्या संयुक्त कारवाईत सोमवारी (21 एप्रिल) सकाळी बोकारो जिल्ह्यातील लालपानिया भागातील लुगु टेकड्यांमध्ये झालेल्या चकमकीत 8 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. चकमकीदरम्यान एक एसएलआर, दोन आयएनएसएएस रायफल आणि एक पिस्तूल सुरक्षा दलांनी जप्त केली आहे. जवानांना कोणतीही दुखापत झालेली नाही. दरम्यान या परिसरात अधूनमधून गोळीबार सुरूच असल्याची माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाने दिली आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी