चंद्रपूर, 21 एप्रिल (हिं.स.)। विदर्भात आज, सोमवारी चंद्रपुरात ४५.६ अंश सेल्सियस सर्वाधिक उष्णतामानाची नोंद झाली.हे देशातीलच नव्हे ,तर जगातील सर्वाधिक तापमान ठरले.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाने चंद्रपूरकरांना अक्षरश हैराण केले आहे. ऊनापासून संरक्षण करण्यासाठी स्कार्फ, टोपी आवर्जून घातली जात आहे. काही दिवसात पारा चांगलाच वाढला असून सोमवारी ब्रम्हपुरीचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहचला.दरम्यान जिल्ह्यात उष्मालाटेच्या संबंधाने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव